News Flash

Coronavirus: मुंबई लोकल बंद नाही होणार, काळजी घेणार !

लोकल बंद करण्याचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नसल्याचंही शेख यांनी स्पष्ट केलं.

(संग्रहित छायाचित्र)

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल, मेट्रो मोनो बंद करण्याची मागणी होते आहे. मात्र असा कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका. सगळ्या लोकल्स वेळापत्रकाप्रमाणे धावू शकतात आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केलं. रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं सरकारने ऐकलं आहे. कारण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही लोकल बंद करण्याचा निर्णय झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांसाठी लोकल बंद कराव्यात अशी मागणी केली होती. तसंच असा काही निर्णय सरकारने घेतल्यास मी त्याला पाठिंबा देईन असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. गर्दी टाळण्यासाठी अनेक मुंबईकरांना घरुन काम कऱण्याचा पर्याय देण्यात आला होता. तरीही मुंबईतल्या अनेक कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन देण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईत गर्दी होणं हे अपरिहार्य आहे. अशात गर्दी टाळण्यासाठी सात दिवस मुंबई लोकल बंद करावी अशी चर्चा होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनीही त्यांना असा कोणताही निर्णय घेऊ नये असं सांगितलं होतं. तसंच आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ असंही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

त्यानंतर महत्त्वाची बाब होती ती मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर काही चर्चा होते का? याकडे सगळ्याचंं लक्ष लागलं होतं. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा कोणताही विषय झाला नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईची लोकल किंवा मेट्रो सेवा बंद केली जाणार नाही ही बाब स्पष्ट झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ४० झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जर ही संख्या वाढली तर कदाचित या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास तरी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 6:03 pm

Web Title: mumbai locals will not closed due to corona virus says minister aslam shaikh scj 81
Next Stories
1 Coronavirus: मुंबई-ठाण्यात जाणवणार भाजीपाल्याची चणचण, APMC मार्केट राहणार दोन दिवस बंद
2 Coronavirus: गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला हा मोठा निर्णय
3 मुंबई लोकल, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने करोनाचा फैलाव थांबेल का?
Just Now!
X