News Flash

‘बुलेट ट्रेनमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही’

मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही असा विश्वास जनतेला आहे.

बुलेट ट्रेन ऐवजी देशात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा असे मत एका वाचकाने व्यक्त केले आहे.

बुलेट ट्रेनमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही असा विश्वास प्रकट करीत लोकांनी महाराष्ट्राच्या अखंडता अबाधित राहिल असे म्हटले आहे. तर, आधी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा मग बुलेट ट्रेनच्या गप्पा राजकारण्यांनी माराव्यात असे देखील काही जणांचे म्हणणे आहे.

बुलेट ट्रेन म्हणजे  केवळ मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांचे म्हणणे तुम्हाला पटते का? असे विचारत लोकसत्ता डॉट कॉमने नेटकौल घेतला होता. बुलेट ट्रेनमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही असे बहुतेक नेटिजन्सला वाटते. आपण आपल्या आयुष्यात हे प्रथमच ऐकत आहोत की एखाद्या ट्रेनमुळे राज्य आणि त्याची राजधानी तोडली जाईल. हे कसे शक्य आहे असा प्रश्न एका लोकसत्ता डॉट कॉमच्या वाचकाने विचारला आहे.

अहमदाबाद- मुंबई दरम्यान सुमारे ९७,००० कोटींची गुंतवणूक असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल असून या प्रकल्पामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या म्हणण्याला बहुतेकांनी दुजोरा दिला नाही. जेव्हा निवडणुका तोंडावर येऊन ठेपतात त्याचवेळी राजकीय नेत्यांना विकासांच्या कामाच्या भूमिपूजनाची आठवण होते तर काही नेत्यांना आपल्या राज्याचा कळवळा येण्यास सुरुवात होती असे मत देखील एका वाचकाने व्यक्त केले आहे.

तर काही लोकांचे म्हणणे आहे. हे विधान आम्हाला पटते कारण प्रथम मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या काय समस्या आहेत, डहाणू, विरार, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या समस्या काय आहेत यावर केंद्र सरकार कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही परंतु कुणीही मागणी न करता अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेन नेमकी कुणासाठी सुरू करीत आहात असा सवालही एका वाचकाने केला आहे. तर एका वाचकाने म्हटले आहे या ट्रेनचा मराठी माणसाला काय फायदा. ही ट्रेन फक्त महाराष्ट्रातील दोनच जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्या रेल्वेचा सर्वाधिक फायदा हा गुजराती व्यापाऱ्यांना होईल त्यातून त्यांनाच उत्पन्न मिळेल.

राज ठाकरेंनी मनात आणले तर बुलेट ट्रेनच काय परंतु विमान आणि बससेवा देखील ते बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही असे एका वाचकाने म्हटले आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की देशात प्रथम पायाभूत सुविधांचा विकास व्हावा त्यानंतरच बुलेट ट्रेनसारख्या खार्चिक प्रकल्पांना मंजुरी मिळावी. देशात अनेक प्रश्न असताना बुलेट ट्रेन सारखा ‘पांढरा हत्ती’ आपल्याला परवडेल का? असा प्रश्न एका वाचकाने विचारला आहे. बुलेट ट्रेनचे जाऊ द्या परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना आतापर्यंत समांतर रेल्वेलाइन टाकता आली नाही असे देखील एका वाचकाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:47 pm

Web Title: mumbai maharashtra bullet train mumbai ahemadabad bullet train loksatta netkaul
Next Stories
1 पेणजवळ कंटेनर उलटला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
2 मानखुर्दजवळ रेल्वे रूळाला तडे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3 राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला
Just Now!
X