News Flash

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

रहिवासी इमारत असल्याने आतमध्ये काही रहिवासी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

(संग्रहित छायाचित्र)

कुर्ला पश्चिमेकडील एका दुमजली इमारतीत आग लागण्याची घडना घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच रहिवासी इमारत असल्याने आतमध्ये काही रहिवासी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुर्ला पश्चिम येथील एस. जी बर्वे मार्गावर असलेल्या पालिकेच्या एल विभागाशेजारी असलेल्या मेहताब या इमारतीत आग लागल्याची ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीमध्ये काही जण अडकल्याच्या शक्यतेमुळे बचावकार्य सुरूवात करण्यात आली आहे.

इमारतीमधून अनेक स्फोटांचे आवाज येत आहेत. आग लागण्यामागील कारण सिलिंडर स्फोट हेच कारण असू शकतात असा स्थानिकांचा संशय आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 11:26 pm

Web Title: mumbai major fire in kurlas mehtab building abn 97
Next Stories
1 अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या
2 वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित
3 मुंबईत घातक कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण, उपचारासाठी विशेष वॉर्ड सुरु
Just Now!
X