News Flash

प्रेयसीचा गळा चिरला, त्यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला, मालाडमधली धक्कादायक घटना

आरोपी ड्रायव्हर अनेकदा महिलेच्या घरी जायचा.

तोंडात सुतळी बॉम्ब फोडून एका ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी त्याने ५८ वर्षीय प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुरार पोलिसांनी या प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

जखमी महिला मालाड पूर्वेला पुषपार्क भागामध्ये राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ते आपल्या आजी-आजोबांकडे राहतात. जखमी महिला अंधेरीतील एका सोसायटीमध्ये जेवण बनवायचे काम करते. महिलेचे आरोपी ड्रायव्हरसोबत मागच्या १५ वर्षापासून प्रेमसंबंध होते.

आरोपी ड्रायव्हर अनेकदा महिलेच्या घरी जायचा. त्यांच्या या प्रेमसंबंधांना महिलेच्या आईचा विरोध होता. त्यावरुन महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये नेहमी भांडणे व्हायची. रविवारी सकाळी सात वाजता दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. महिला कामावर जाण्यासाठी घरातून निघण्याची तयारी करत होती.

त्यावेळी आरोपीने तिच्याकडे आपले कपडे मागितले. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. संतापाच्या भरात आरोपीने त्याच्या जवळचा चाकू काढला व महिलेचा गळा चिरला. महिला खाली कोसळल्यानंतर त्याने सुतळी बॉम्ब पेटवून स्वत:च्या तोंडात ठेवला. महिला आणि तिच्या प्रियकराची प्रकृती गंभीर आहे. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे असे कुरार पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 11:51 am

Web Title: mumbai malad man tries to kill self with sutli bomb in mouth dmp 82
Next Stories
1 मंदिरे उघडण्यावरून राजकारण
2 सेनेला मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिलाच नव्हता
3 शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
Just Now!
X