खार पोलिसांच्या हालचालींमुळे चोरटय़ाचे बँक खाते गोठविण्यात यश

मुंबई : औषध कंपन्यांचे गुगलवरील तपशील बदलून किंवा या कंपन्यांचे नाव वापरून ऑनलाइन चोरटय़ाने रेमडेसिविर, टोसीलीझुमाबच्या शोधार्थ जंग जंग पछाडणाऱ्या नागरिकांची फसवणूक सुरू के ली आहे. असाच एक प्रकार खारमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणासोबत घडला. चोरटय़ांनी त्याच्याकडून पैसेही उकळले. मात्र खार पोलिसांनी वेगाने हालचाली करून संबंधित बँक खाते गोठवले. या खात्यावर लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलसांना मिळाली.

कु णाल कटारिया असे तक्रारदाराचे नाव आहे. नातेवाईकासाठी रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यक होते. मात्र ते कु ठेच उपलब्ध होत नव्हते. अखेर गुगलआधारे रेमडेसिविरची उपलब्धता शोधण्यासाठी कु णाल यांनी शोधाशोध सुरू के ली. तेव्हा सिप्ला फाऊंडेशन नावाचे संके तस्थळ त्यांना आढळले. त्यावर रेमडेसिविर उपलब्ध असल्याचे ठळकपणे लिहिले होते. संके तस्थळावर उपलब्ध क्र मांकावर कु णाल यांनी संपर्क साधला. सहा रेमडेसिवीरसाठी त्यांना २० हजार ४०० रुपये ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ते भरले. मात्र व्यवहार पूर्ण न झाल्याचे सांगत त्यांच्याकडून आणखी एकदा ही रक्कम संबंधित खात्यात भरण्यास सांगण्यात आले. रेमडेसिविरची निकड असल्याने कु णाल यांनी कसलाही विचार न करता दोन वेळा ही रक्कम भरली. ते रेमडेसिवीर कु प्यांची वाट पाहू लागले. अवघ्या काही तासांत रेमडेसिविर घरपोच होईल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु बराच विलंब झाल्याने त्यांची चिंता वाढली. दुसरीकडे कु प्या पुरवणाऱ्या, पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल बंद होता. अखेर फसवणूक झाल्याची जाणीव होताच कु णाल खार पोलीस ठाण्यात आले. प्रकरण लक्षात घेऊन खार पोलीस ठाण्याच्या अंमलदार नेत्रा मुळे यांनी तातडीने कु णाल यांनी ज्या बँक खात्यात पैसे भरले ते नोडल अधिकाऱ्याच्या मदतीने गोठवले. तत्पूर्वी या खात्यात सुमारे १७ लाख रुपये होते. खाते गोठवण्यापूर्वी १३ लाख रुपये अन्य खात्यांत वळते करण्यात आले होते. उर्वरित चार लाख रुपयांमध्ये कु णाल यांनी पाठवलेली रक्कम जमा होती. हे खाते बँक ऑफ इंडियाच्या पाटणा येथील शाखेचे होते. अंमलदार मुळे यांनी के लेल्या वेगवान हालचालींमुळे कु णाल यांची फसवणूक रोखण्यात खार पोलिसांना यश आले.

सिप्ला फाऊंडेशन या संकेतस्थळाशी औषध उत्पादनात आघाडीवर असलेल्या सिप्ला कं पनीचा काहीही संबंध नाही. गरजवंतांचा विश्वास संपादन करण्यासाठी या कंपनीचे नाव भामटय़ांनी वापरले असावे, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.