News Flash

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला दोन वर्षांचा तुरुंगवास

कर्जत-सीएसएमटी लोकलमध्ये २०१२ मध्ये घडली होती घटना

प्रातिनिधीक छायाचित्र

कर्जत-सीएसएमटी लोकलमधून प्रवासादरम्यान सन २०१२ मध्ये ट्रॅव्हल कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका महिलेशी गैरवर्तन केले होते. या व्यक्तीला मुंबईच्या दंडाधिकारी कोर्टाने मंगळवारी दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

कैलास पहाडी (वय ३०) असे दोषीचे नाव असून कोर्टाने त्याला दोन वर्षांचा कडक तुरुंगवास आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावला. यांपैकी ८,००० रुपये पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोर्टाच्या निरीक्षणानुसार पहाडीने केलेल्या कृत्याचा पीडित महिलेच्या मनावर मोठा परिणाम झाला, यामुळे तिने आपला आत्मविश्वास गमावला. घटना घडली तेव्हा पीडित महिला डोंबिवली येथे रहायला होती तसेच सीएसएमटी येथे ती एका खासगी कंपनीत कामाला होती. आपल्या तक्रारीत पीडितेने म्हटलं होतं की, १५ फेब्रुवारी २०१२ रोजी कर्जत ते सीएसएमटी लोकलमधू प्रवास करत असताना दोषी पहाडीने तिला पाठीमागून मिठी मारली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळलेल्या महिलेने त्याला पाहिले आणि या कृत्याबाबत त्याला जाब विचारला. मात्र, तो त्याचक्षणी महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून लगेच शेजारच्या जनरल डब्यात शिरला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या पीडितेने आपल्या महिला सहप्रवाशांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी कांजुरमार्गला पोहोचल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या हेल्पलाइनवर फोन करुन पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला डोंबिवली स्थानकात पकडले. आरपीएफच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पहाडीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आठ वर्षे हा खटला चालला यामध्ये कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. यामध्ये पीडित महिलेने स्वतः आणि तिच्या सहकारी प्रवाशांनी पहाडीला गैरवर्तन करताना पाहिल्याचे सिद्ध झाल्याने तो यामध्ये दोषी ठरला. त्यानंतर कोर्टाने त्याला दोन वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 2:25 pm

Web Title: mumbai man sentenced to two years of rigorous imprisonment for groping a woman at csmt aau 85
Next Stories
1 शरद पवारांनी केलं ट्विट, डॉ. आंबेडकरांना अभिवादन करत म्हणाले…
2 लालबागमध्ये सिलेंडरचा स्फोट; २० जण होरपळून जखमी
3 पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद, चैत्यभूमीवर गर्दी नाही
Just Now!
X