23 November 2017

News Flash

वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रेमभंगातून आत्महत्या

आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली होती

मुंबई | Updated: July 17, 2017 1:59 PM

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. नितीन शिर्के (वय २८) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

एका ख्यातनाम मराठी वृत्तवाहिनीत नितीन शिर्के साऊंड इंजिनीअर म्हणून काम करत होता. नितीनने रविवारी रात्री लोअर परेल स्थानकाजवळ ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. नितीनने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट पोस्ट केली होती. नितीनने पोस्ट टाकताच चॅनलमधील वरिष्ठांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत नितीनने आत्महत्या केली होती. चॅनलमधील निवेदिका व एक कर्मचारी माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते. प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on July 17, 2017 1:59 pm

Web Title: mumbai marathi tv channel employee committed suicide in lower parel leaping before running train