News Flash

मुंबई अर्ध मॅरेथॉनमध्ये कविता राऊतला सुवर्ण

अर्ध मॅरेथॉनमधील खुल्या गटात भारताच्या इद्रंजित पटेल याने भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले तर दुस-या स्थानी अत्वा भगत राहिला.

| January 18, 2015 12:16 pm

स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनला बोचर्‍या थंडीत  सकाळी सुरुवात झाली. सलग १२ वर्षांपासून सुरु असलेल्या या मॅरेथ़ॉनमध्ये मुंबई, महाराष्ट्रासह परदेशातील धावपटू सहभागी झाले होते.
अर्ध मॅरेथॉनमधील खुल्या गटात भारताच्या इद्रंजित पटेल याने भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले तर दुस-या स्थानी अत्वा भगत राहिला. सावरपाडा एक्सप्रेस अशी ओळख असलेल्या कविता राऊत यंदाही महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान मिळवले. उरणची सुप्रिया पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला.
मुख्य मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा तेस्फे अबेराने बाजी मारली. त्यापाठोपाठ त्याचा सहकारी डेरेजे डेबिले याने दुसरा क्रमांक पटकावला. तर केनियाच्या ल्यूक किबेटला तिस-या स्थानी समाधान मानावे लागले. गेल्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या इव्हान्स रुटोला यंदाच्या मॅरेथॉनमध्ये पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही. पुरुषांसोबतच्या महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्येही इथिओपियाच्या महिलांनी वर्चस्व गाजवले. इथिओपियाच्या मेकॅशने या मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पहिल्या दहाजणांमधील आठ महिला धावपटू या इथिओपियाच्या होत्या. भारताच्या ललिता बाबरहिने या स्पर्धेत नववे स्थान पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2015 12:16 pm

Web Title: mumbai marathon 2015 kavita raut winner of half marathon
टॅग : Kavita Raut
Next Stories
1 अल्पसंख्याकांच्या विकासाकरिता १०० कोटीसाठी हमी
2 ‘एसटी’ला ९८८ कोटींचा टोलफटका
3 मेट्रो विधानभवन स्थानकासाठी पक्ष कार्यालयांचे स्थलांतर
Just Now!
X