News Flash

“तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात

कंत्राट कोणाला दिले विचारणाऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. नेटकऱ्याने लसीसंदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिलं. यानंतर सोशल मीडियावर किशोरी पेडणेकर ट्रोल होऊ लागल्या. अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

ग्लोबल टेंडर संबधात ट्विट केल्यानंतर विचारण्यात आला होता प्रश्न

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

“…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत!

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं.

हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

“ते ट्विट मी केलं नव्हतं,” ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला आहे. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीदेखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 9:44 am

Web Title: mumbai mayor kishori pednekar controversial tweet bmc global tender sgy 87
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 इंधनदरवाढ हे केंद्र सरकारचं अपयश; मोदींचं ९ वर्षांपूर्वीचं ते ट्विट पुन्हा चर्चेत
2 स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युने खलीकडे केली विचित्र मागणी, म्हणाला…
3 परीक्षा रद्द झाल्यानंतर झोमॅटोवरुन मिठाई मागवणारे लवकरच तिथे काम करतील; युजरने उडवली खिल्ली
Just Now!
X