News Flash

नाशिकमधील दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये प्रवेशबंदी

सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाईचा महापौरांचा इशारा

नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून झालेल्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गळतीमुळे रुग्णालयात दाखल व्हेंटिलेटरवरील रुग्णांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा न झाल्यान त्यांना आपला जीव गमवावा लागला. नाशिकच्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठा निर्णयग घेतला असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली.

२४ करोनाबाधितांचा हकनाक बळी

मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका असा आदेश रुग्णालयांना देण्यात आला असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. १० मीटर दूरपर्यंत जाळ्या लावा. तसंच तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा, एकदा जाऊन सर्व सुरळीत आहे की नाही याची काळजी घ्या असं सांगितलं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

तसंच लिक्विड ऑक्सिजनसाठी यंत्रणा आणखी सुसज्ज करतोय सांगताना किशोरी पेडणेकर यांनी कोविड सेंटर उभं करतानाच आपण सुरक्षेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली होती अशी माहिती दिली. “आपण सगळ्यांचं ऑडिट करत आहोत. खासगी रुग्णालयात असणाऱ्या बेड्सच तसंच येणाऱ्या प्रत्येत गोष्टींचं रुग्णालयाचं ऑडिट होत आहे. ऑडिट आणि सुरक्षा एकत्र सुरु आहे,” असं त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:47 pm

Web Title: mumbai mayor kishori pednekar on nashik oxygen leak sgy 87
Next Stories
1 “१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन!
2 “तुटवडा असतानाही बांग्लादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?” जितेंद्र आव्हाडांचा सवाल!
3 शिवसेना नगरसेविकेचा भगवती रुग्णालयात गोंधळ; डॉक्टरांचा अर्वाच्च भाषेत पाणउतारा
Just Now!
X