News Flash

सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान उघड झालं-किशोरी पेडणेकर

महापौर किशोरी पेडणेकर यांचा नाव न घेता भाजपाला टोला

संग्रहित छायाचित्र

सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या झाली असल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. “मुंबईला बदनाम करण्याचे हे कारस्थान होते, खोट्यांचे पितळ उघड पडलं आहे.” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलीस, मनपा, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. मात्र खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. यामुळे लोकांचा आता मनपावरचा विश्वास वाढला आहे असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यंत्रणांनी काय समोर आणलं ते पाहा. मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र केले गेले. मात्र आमचा यंत्रणांवर विश्वास आहे, या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घ्यावा, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईची आणि शिवसेनेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांचे हात रिकामेच राहिले आहेत. मुंबईच्या जनतेने समाजमाध्यमातून त्यांना चांगले उत्तर दिले आहे असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 1:09 pm

Web Title: mumbai mayor kishori pednekar reaction on aiims report and sushant sing rajput case scj 81
Next Stories
1 “मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारचा प्रस्तावच नाही”
2 सुशांतच्या मृत्यूबाबतच्या अहवालाने आमच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब – मुंबई पोलीस
3 “नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत”
Just Now!
X