News Flash

‘महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते!’

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली.

स्नेहल आंबेकर  

स्नेहल आंबेकर यांची मुक्ताफळे

‘महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते’ अशी मुक्ताफळे उधळत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला पुन्हा एकदा अडचणीत आणले. महापौरांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केल्यानंतर शिवसेनेचा एकही सदस्य त्यांच्या मदतीला धावून गेला नाही.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर पीठासीन अधिकारी होत्या. त्या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना कोपरखळी मारली.

स्थायी समितीत महापौर आल्यात, पण काहीच बोलत नाहीत. त्या गप्प आहेत. त्या बोलल्या तर तात्काळ बातम्या होतात, असा शालजोडीतील टोला प्रवीण छेडा यांनी हाणला आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली. स्नेहल आंबेकर यांनाही स्वत:ला आवरता आले नाही, स्मितहास्य करीत त्या पटकन उत्तरल्या, हो, महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते.

महापौरांच्या या उत्तरामुळे शिवसेनेचे नगरसेवक गांगरले. पुन्हा  वाद निर्माण होणार अशी चिन्हे निर्माण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 4:23 am

Web Title: mumbai mayor snehal ambekar statement on publicity
टॅग : Snehal Ambekar
Next Stories
1 प्रस्तावित भाडेकरू कायद्याविरोधात मनसेची निदर्शने
2 धनगर आरक्षणासाठी चार युवकांची घोषणाबाजी; विरोधकांची टीका
3 जेजेतील आंदोलन सुरूच; ‘मार्ड’चा पाठिंबा
Just Now!
X