मुळातच समुद्रावर वसलेल्या मुंबईत जमिनीच्या खाली पाणीच पाणी. त्यातच भूकंपप्रवण क्षेत्र. अशा प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत या शहरात भुयारी मेट्रोसारखा प्रकल्प यशस्वी होईल का, याबाबत नाना शंका उपस्थित केल्या जात आहेत. या प्रकल्पामुळे गिरणगावातील मराठी माणूस विस्थापित होण्याची भीती, पर्यावरणाला धक्का पोहोचण्याची शक्यता असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. याच पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प काय आहे, तो कसा उभारला जाणार, त्याचा मुंबईकरांच्या जीवनात आणि पर्यावरणावर काही परिणाम होणार का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा कसा होणार, याचा घेतलेला वेध..

मुंबईच्या भूगर्भात चालविण्यात येणारी मुंबई मेट्रो-३ मध्ये भुयार तयार करण्याचे काम करण्यासाठी मुंबईच्या बंदरावर ‘टनल बोअरिंग मशिन्स’ (‘टीबीएम’) दाखल होणार आहेत. हे ‘टीबीएम’ म्हणजे नेमके काय? मुंबई मेट्रोचे जाळे पसरविण्यासाठी याची नेमकी काय भूमिका असेल?

  • मुंबई मेट्रो-३ ही मार्गिका कुलाबा-वांद्रे-सीप्झ यांना जोडणारी असून ती पूर्णत: भुयारी असणार आहे. या मार्गात एकूण २७ स्थानके असणार आहेत. प्रत्यक्ष मार्ग ३३.५ किमीचा असला तरी या प्रकल्पासाठी ५१ किमीचा भुयारी मार्ग खोदला जाणार आहे. हा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी ‘टनल बोअरिंग मशिन्स’चा (टीबीएम) वापर केला जाणार आहे.
  • ही ‘टीबीएम’ यंत्रे जमिनीमध्ये सोडण्यासाठी मार्गावरील कफ परेड, आझाद मैदान, विज्ञान केंद्र, नयानगर, सिद्धिविनायक, बीकेसी, विद्यानगरी, सहार, विमानतळ टी-२, पाली मैदान आणि मरोळ नाका या अकरा ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत.
  • मुंबईत दाखल झालेले ‘टीबीएम’ विविध सुटय़ा भागांमध्ये असणार आहे. त्याचे भाग मुंबई बंदरावरून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून पाच दिवसांनी माहीममधील नयानगर येथील खड्डय़ाजवळ नेले जाणार आहे. तेथून ते भाग खड्डय़ामध्ये सोडले जातील. यामध्ये पुढच्या बाजूचा संरक्षक भाग, मधील संरक्षक भाग, कटर, इरेक्टर अशा इतर सुटय़ा भागांचा समावेश आहे.

खड्डय़ात ४५ दिवसांमध्ये

  • या भागांची जोडणी करून ‘टीबीएम’द्वारे प्रत्यक्षात ऑक्टोबरच्या चौथ्या आठवडय़ात बोगदा खोदण्याच्या कामास सुरुवात होईल.
  • हे खोदकाम करत असताना ६.५ मीटर व्यासाचा बोगदा तयार होणार असला तरी त्याच्या आतमध्ये बसविण्यात येणारे सेगमेंट लावल्यानंतर प्रत्यक्ष हा बोगदा ५.८ मीटर व्यासाचा तयार होणार आहे.
  • बोगदा सक्षम करण्यासाठी सुमारे दोन लाख ८० हजार टनेल सेगमेंट्स वापरले जाणार आहेत. हे टनेल सेगमेंट तयार करण्याचे काम सध्या वडाळा, बीकेसी, माहुल आणि जेव्हीएलआर परिसरातील सहा कास्टिंग यार्डमध्ये सुरू आहे.
  • हे सर्व खोदकाम मुंबईच्या भूगर्भात २६ मीटर खोलवर चालणार आहे.
  • या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाचे सात विभाग करण्यात आले आहेत. यामुळे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
  • पहिले ‘टीबीएम’ मुंबईत दाखल झाले असून पाच ‘टीबीएम’ सप्टेंबरमध्ये, पाच ऑक्टोबरमध्ये, तर तीन नोव्हेंबरमध्ये दाखल होणार आहेत. उर्वरित सर्व ‘टीबीएम’ फेब्रुवारी महिन्यात दाखल होणार आहेत.
  • पहिल्या ‘टीबीएम’ मशीनच्या सा’ााने माहीम येथील नयानगर ते दादर मेट्रोपर्यंतचे अडीच किमीच्या बोगद्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या ‘टीबीएम’च्या सा’ााने दिवसाला दहा मीटरचेच खोदकाम केले जाणार आहे. यामुळे हे काम पूर्ण होण्यास एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.
  • पहिल्या बोगद्याचे काम एक किमीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बाजूचा बोगदा खोदण्याचे काम सुरू केले जाणार आहे. या मार्गावरील संपूर्ण बोगदा तयार करण्याचे काम दोन वर्षांच्या आत पूर्ण होईल.

टीबीएमअसे आहे..

‘टीबीएम’मध्ये विविध प्रकार असतात. यातील ‘अर्थ प्रेशर बॅलेन्स(ईपीबी) टीबीएम’, ‘हार्ड रॉक टीबीएम’, ‘स्लरी टीबीएम’ आणि ‘डय़ुएल मोड टीबीएम’ या प्रकरच्या ‘टीबीएम’चा वापर मुंबईतील भुयारी मार्ग तयार करण्यासाठी केला जाणार आहे. मेट्रो-३चा संपूर्ण मार्ग तयार करण्यासाठी एकूण १७ ‘टीबीएम’चा वापर केला जाणार आहे. यापैकी १० ‘टीबीएम’ नवीन आहेत. तर सात जुने ‘टीबीएम’ आवश्यक ती सुधारणा करून वापरले जाणार आहेत. हे नूतनीकरण केलेले ‘टीबीएम’ नवी दिल्ली आणि सिंगापूर येथून येणार आहेत. नवीन ‘टीबीएम’ची खरेदी जर्मनीतील हेरन्केच्ट, अमेरिकेतील रॉबिन्स, चीन मधील एसटीईसी आणि ऑस्ट्रेलियामधील टेरटेक या कंपन्यांकडून करण्यात आली आहे.

मेट्रो-३झाल्यानंतर..

  • १७ लाख मुंबईकर रोज मेट्रोने प्रवास करतील.
  • ,५६,७७१ वाहनांच्या खेपा रस्त्यांवरून कमी होतील.
  • ,५६,७७१ वाहनांच्या खेपा रस्त्यांवरून कमी होतील.
  • ५५० कोटी रुपयांची बचत
६.५ मीटर व्यास, ११० मीटर लांबी 

मेट्रो ३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ

एकूण स्थानके २७

  • चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल व महालक्ष्मी येथे प्रवाशांना उपनगरीय रेल्वे मार्गावरील गाडय़ांची अदलाबदल करता येईल. मरोळ नाका येथे मेट्रो वनशी जोडणार.
  • सर्व स्थानके ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असणार आहे. भुयारी स्थानके असल्यामुळे तेथील वायुवीजन व वातानुकूलन प्रणाली अत्याधुनिक असणार आहे.
  • स्थानकांवर सरकते जिने, उद्वाहक, सुरक्षित फलाट, रेल्वेचे बंद दरवाजे, सीसीटीव्ही देखरेख, यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण यांना वाढीव सुरक्षा मिळेल.

१०० मिनिटे

  • कफ परेड ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा कालावधी

५० मिनिटे

  • ‘मेट्रो -३’मधून प्रवासाचा कालावधी

या मार्गावर ३० हून अधिक शैक्षणिक संस्था, १३ हून अधिक रुग्णालये आणि १४ हून अधिक धार्मिक स्थळे