18 September 2020

News Flash

मेट्रो रेल्वेतून फिरा अवघ्या पाच रुपयांत

कमी गर्दीच्या वेळी मेट्रो रेल्वेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पहाटे साडेपाच ते सकाळी आठ या वेळेत अवघ्या पाच रुपयांत मेट्रो प्रवासाची सवलत दिली आहे.

| June 19, 2014 12:06 pm

कमी गर्दीच्या वेळी मेट्रो रेल्वेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पहाटे साडेपाच ते सकाळी आठ या वेळेत अवघ्या पाच रुपयांत मेट्रो प्रवासाची सवलत दिली आहे. गुरुवारपासून हा सवलतीचा दर सुरू होत असून आठवडाभरासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेसाठी सात जूनपर्यंत दहा रुपयांचा सवलतीचा तिकीट दर ही मेट्रो चालवणाऱ्या ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ने जाहीर केला होता. त्यानंतर तिकिटाचे दर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये, ४० रुपये असे राहतील, असेही सांगण्यात आले होते. सरकार मात्र किमान नऊ रुपये ते कमाल १३ रुपये या दरावर ठाम आहे. त्यातून वाद सुरू आहे. सध्या अवघ्या दहा रुपयांत मेट्रो प्रवासाची मुभा असताना आता अल्प गर्दीच्या वेळी म्हणजेच पहाटे साडेपाच ते सकाळी आठ या वेळेत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने तिकिटाचा दर आणखी कमी करत पाच रुपयांत मेट्रो प्रवास अशी योजना जाहीर केली आहे. गुरुवारपासून हे दर सकाळच्या पहिल्या अडीच तासांसाठी लागू होतील आणि आठवडाभर राहतील. तिकीट घेतल्यानंतर अध्र्या तासात प्रवास सुरू करण्याची अट असणार आहे. ‘स्मार्ट कार्ड’धारकांनाही या वेळेत पाच रुपयांत प्रवास करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:06 pm

Web Title: mumbai metro launches concessional fare for early morning
Next Stories
1 पनवेल-ठाणे लोकलमधील हत्या चोरीच्या उद्देशाने
2 ताबा सुटलेल्या इनोव्हा गाडीखाली वृद्ध महिला ठार
3 तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक
Just Now!
X