News Flash

“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!”; कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांवर भाजपाचा गंभीर आरोप

मेट्रो ३ कांजूरमार्ग कारशेडबद्दल शेलार यांनी काही सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर केला गंभीर आरोप

मेट्रो ३ कांजूरमार्ग कारशेडबद्दल शेलार यांनी काही सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर केला गंभीर आरोप.

आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास प्रचंड विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने कारशेड आरेतून कांजूरमार्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून बरंच राजकारणंही होताना दिसत आहे. कांजूरमार्ग येथील जागेच्या मालकीवरून आता वाद सुरू या कारशेडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत एमएमआरडीएने दिलेल्या माहितीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काही सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे. कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद निर्माण झाला असून, न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान न्यायालया देण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही? मग एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?,” असे सवाल आशिष शेलार यांनी केले आहेत.

हेही वाचा- “राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर?”

“कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी”… खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो. हळूहळू सत्य समोर येतेय! जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा- “…उलट सावकारासारखी वसूली कसली करताय?”

‘अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र’ म्हणत यापूर्वीही केली होती टीका

“मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत, असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते,” असंही शेलार यांनी यापूर्वी बोलताना म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 12:59 pm

Web Title: mumbai metro update kanjurmarg metro car shed uddhav thackeray bjp ashish shelar metro car shed bmh 90
Next Stories
1 हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण प्रकरण; मुंबई पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
2 मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ
3 म्युकरबाधित मृतांच्या संख्येत महिनाभरात ८३ टक्के वाढ
Just Now!
X