07 March 2021

News Flash

‘भुयारीमार्गाचा धोका नाही!’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे पुढील महिन्यांपासून मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलू शकतो. हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वेमधील गर्दी करण्याबरोबरच रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवू शकतो. शिवाय पर्यावरणाचेही संवर्धन करण्यास उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प सर्वार्थाने मुंबईकरांच्या उज्जवल भविष्यासाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे पुढील महिन्यांपासून मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि मार्च २०२१ मध्ये पहिला टप्पा तर ऑक्टोबपर्यंत दुसरा टप्पा कार्यान्वित होईल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

सुमारे ३३.५ किमी लांबीच्या आणि २३ हजार कोटी रुपये खर्चाच्या या भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या मार्गामुळे नरिमन पॉइंट, वरळी, लोअर परेल, वांद्रे-कुर्ला संकुल, सिप्झसारखी महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे, मध्य आणि पश्चिम रेल्वे, मेट्रो-१, आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडले जाणार असून नागरिकांना दक्षिण मुंबई ते अंधेरी असा थेट आरामदायी प्रवास उपलब्ध होणार असल्याचे भिडे यांनी सांगितले.

या भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकाम करताना कोणत्याही घराचे नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई समुद्रावरच वसली असल्याने आणि जमिनीखाली पाणीच पाणी असल्याने हा प्रकल्प यशस्वी होईल का, तसेच हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने भूकंप झाल्यास प्रकल्पाचे काय होईल अशा अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचे भिडे यांनी सांगितले. ‘मेट्रो मार्ग हा जमिनीपासून २६ मीटर खालून बेसॉल्ट दगडातून जाणार आहे. तसेच भूकंप झाला तरी त्याचा प्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही अशा पद्धतीचे बांधकाम केले जाणार आहे. लंडन, पॅरिस, सिंगापूर यांसारख्या शहरांमध्ये भुयारी मेट्रोच असून आपल्या देशातही हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल,’ असे त्या म्हणाल्या.

मेट्रो-३’ प्रकल्पास कोणाचाही विरोध नसून काही लोकांच्या शंका आहेत. त्या दूरही केल्या जात आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी चांगले पुनर्वसन पॅकेज देण्यात आले असून लोक स्वत:हून आपली घरे रिकामी करून देत आहेत. पर्यावरणाच्या मुद्दय़ावरून काहींचा कारशेडला विरोध असला तरी त्यांचेही समाधान होईल आणि निर्धारित कालावधीत मेट्रो धावेल.

अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 2:40 am

Web Title: mumbai metro3 underground metro mumbai underground metro risk ashwini bhide managing director mmrc
Next Stories
1 शहरबात : पुरानंतर मुंबईकर जिंकले; पण पालिका हरली..
2 आठवडय़ाची मुलाखत : भाडेकरूकेंद्री पुनर्विकास होण्यासाठी चर्चा हवी!
3 काँग्रेसला धक्का, राजहंस सिंह यांचा भाजपत प्रवेश
Just Now!
X