News Flash

मुंबई – कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली पत्रकारपरिषदेत माहिती.

संग्रहीत

म्हाडाचे १०० फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवले जाणार आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती राज्याच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरूवार) पत्रकापरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारी देखील उपस्थित होते.

यावेळी आव्हाड म्हणाले, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे व असं अनेकदा दिसून येतं की बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना मुंबईतील रस्त्यांवर पडून रहावं लागतं. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटतं. म्हणून आम्ही मानवतेच्यादृष्टीने असा विचार केला की, आमच्याकडे जेवढे काही फ्लॅट्स आहेत, ते आम्ही आज १०० व आगामी काळात ते वाढवून २०० करणार आहोत आणि ते फ्लॅट्स आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत. त्यानंतर त्या फ्लॅट्सशी म्हाडाचा काहीच संबंध राहणार नाही. याचं कारण हे आहे की यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. आम्हाला तो नकोय, ज्यांना खरचं गरज आहे, त्यांनाच त्याचा लाभ मिळायला हवा. यासाठी आम्ही हे फ्लॅट्स टाटाला देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा व म्हाडामध्ये तसा करार देखील झालेला आहे. करीरोड स्टेशनच्या बाजूला व टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे फ्लॅट्स आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:01 pm

Web Title: mumbai mhadas big decision for the convenience of cancer patients msr 87
Next Stories
1 “माझ्याच बंगल्यात नऊ जणांना करोना झालाय”; अजित पवारांनी केलं काळजी घेण्याचं आवाहन
2 “संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये?” UPA अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर काँग्रेसची आगपाखड!
3 “फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून राज्यपालांना फोन करून विचारतात…,” कुणाल कामराचं खोचक ट्विट
Just Now!
X