26 October 2020

News Flash

मनसेचा दणका, दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या

अशा दुकानदारांना दणका देणारच, मनसेचा इशारा

दादरमधील ख्यातनाम ज्वेलर्स आणि माहिममधील एका हॉटेलवर गुजराती भाषेतील पाटी लावल्याचे समोर आले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे. मनसेने दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या आहेत. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती.

लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेची पिछेहाट झाली असून पराभवांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकारिणीत बदल केले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे. दादरमधील ख्यातनाम पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स आणि माहिममधील शोभा हॉटेलवर गुजराती भाषेतील पाटी लावल्याचे समोर आले होते. हा प्रकार समजताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांवर धडक दिली आणि गुजराती भाषेतील पाटी हटवण्यास सांगितले. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुजराती भाषेतील पाटी हटवण्यात आली.

महाराष्ट्रात गुजराती पाट्या पाहून पाहा आणि थंड बसा हे धोरण आम्हाला मान्य नाही, आम्ही अशा दुकानदारांना दणका देणारच असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला होता. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. मग सध्या सर्वत्र या भाषेची सक्ती करण्याचे प्रयत्न का सुरु आहे असा सवाल त्यांनी विचारला. लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2017 2:05 pm

Web Title: mumbai mns party workers protest against gujarati nameplates on jewellery shops hotel in dadar mahim
Next Stories
1 अभिनेता इंदर कुमारचे निधन
2 पार्ल्यातील उद्यान पुन्हा उजाड!
3 पालिका रुग्णांना ‘बासमती’ जेवण
Just Now!
X