11 August 2020

News Flash

आजपासून ‘मुंबई मान्सून’

मुंबईमध्ये मान्सून पोहोचण्यास उशीर होणार असला तरी पावसात जनजीवन सुरळीत राहावे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने तयार केलेले मुंबई मान्सून अ‍ॅप’ १ जूनपासून सुरू होत आहे.

| June 1, 2014 04:11 am

मुंबईमध्ये मान्सून पोहोचण्यास उशीर होणार असला तरी पावसात जनजीवन सुरळीत राहावे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने तयार केलेले मुंबई मान्सून अ‍ॅप’ १ जूनपासून सुरू होत आहे. रविवारपासून ते डाउनलोड करता येणार आहे.
पावसाचा अंदाज घेण्यासाठी पालिकेने शहरभरात ५४ पर्जन्यमापन केंद्र सुरू केली आहेत. तेथील पावसाचे प्रमाण या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून समजणार आहे. विशिष्ट भागात पडत असलेल्या पावसाच्या प्रमाणावरून कोणत्या रस्त्याने जावे वा जाणे टाळावे, याची निवड करण्यास मदत होणार आहे.
वाहतुकीच्या मार्गात होत असलेला बदलही या ‘अ‍ॅप’द्वारा समजणार आहे. पावसासोबत तापमान, आद्र्रता व मुंबई हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला अंदाजही या अ‍ॅपवरून पाहता येणार असून ‘आयओएस’, ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ व विंडो’ प्रणालीवरून हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2014 4:11 am

Web Title: mumbai monsoon
Next Stories
1 सात महापालिकांत झोपडपट्टी प्राधिकरणे
2 ‘दख्खनच्या राणी’चा ८५ वा वाढदिवस जल्लोषात साजरा
3 ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही एक चळवळ -विजया मेहता
Just Now!
X