News Flash

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली

आयुक्त चहल व जयस्वाल यांच्यात गेले अनेक दिवस कुरबुरी सुरू होत्या.

संजीव जयस्वाल

मुंबई : मुंबई महानगरपालिके चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी राज्य सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त के ल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची सोमवारी बदली करण्यात आली. महापालिके च्या अतिरिक्त आयुक्तपदी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकु मार यांची नियुक्ती करण्यात आली.

ठाणे महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यावर जयस्वाल यांची गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आयुक्त चहल व जयस्वाल यांच्यात गेले अनेक दिवस कुरबुरी सुरू होत्या. जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार के ली होती. यातूनच जयस्वाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती मत्स्यविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. ए. शैला यांची विक्रीकर विभागाच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:08 am

Web Title: mumbai municipal corporation additional commissioner sanjeev jaiswal transferred zws 70
Next Stories
1 ‘आयआयटी’मध्ये महिला संशोधकासाठी अध्यासन
2 मानवाधिकार आयोगाचे कामकाज ठप्प
3 नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई!
Just Now!
X