05 March 2021

News Flash

करोनाच्या लढाईवर मुंबई पालिकेचा सहाशे कोटींचा खर्च

ठाणे-पालघरमधील रुग्णांसाठी पालिके ची मदत

चेंबूरमधील वाशीनाका परिसरात रविवारी नागरिकांची करोना चाचणी घेण्यात आली.

ठाणे-पालघरमधील रुग्णांसाठी पालिके ची मदत

संदीप आचार्य लोकसत्ता

मुंबई : मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. मुंबईतील करोनाला नियोजनबद्ध आटोक्यात आणताना पालिकेने खर्चाची कोणतीही चिंता केली नाही तर रुग्ण वाचला पाहिजे या भूमिकेतून आरोग्यव्यवस्था बळकट करीत नेली. महापालिकेने गेल्या पाच महिन्यांत करोनाच्या लढाईसाठी ६०० कोटींपेक्षा जास्त खर्च के ला आहे. मुंबईतील करोना आटोक्यात आल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील पालिकांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

धारावी झोपडपट्टीतील करोना ज्या पद्धतीने रोखला त्याचे कौतुक झालेच, पण  रोजच्या चाचण्या, दाखल होणारे रुग्ण, बरे झालेल्या रुग्णापासून मृत्यू पावणाऱ्यांच्या माहितीपर्यंत कोणतीच गोष्ट आम्ही लपवली नाही, असा दावा मुंबई महानगरपालिके चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी के ला. मुंबईत सव्वा लाखांच्या आसपास रुग्ण असून, यातील ९२ हजारांहून अधिक बरे होऊन घरी परत गेले. आता प्रतिदिन दहा हजारांहून अधिक चाचण्या होत असून हजार ते बाराशे करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मात्र त्यातील रुग्णालयात दाखल करण्यासारखे दोनशे ते अडीचशे रुग्ण आहेत. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २० हजारांच्या आसपासच आहे. कालपर्यंत करोनाचे रुग्ण रुग्णालयात खाटा मिळाव्यात, यासाठी वणवण भटकत होते. आम्ही गेल्या दोन महिन्यांत केलेल्या  नियोजनामुळे चित्रच बदलल्याचे चहल यांनी सांगितले. रुग्णाचा चाचणी अहवाल २४ तासांत देणे बंधनकारक केले असून सकाळी अहवाल मिळताच वॉर्डातील डॉक्टर रुग्णाशी बोलून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करतात.

मुंबई महापालिकेने करोनाच्या लढाईत आतापर्यंत ६१० कोटी रुपये खर्च केले आहेत. यात रुग्ण व डॉक्टरांच्या जेवणासाठी ७३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले. केंद्रीय खरेदी विभागाच्या माध्यमातून १२४ कोटी ४४ लाख रुपयांची उपकरणे खरेदी करण्यात आली. मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल पद्धतीच्या कामासाठी सहा कोटी ६० लाख, विशेष आरोग्य अधिकारी ६३ कोटी ८४ लाख, पालिका वॉर्डातील नियंत्रण कक्ष, सेव्हन हिल्स हॉस्पिटल व बीकेसी, गोरेगाव, दहिसर, मुलुंड, वरळी व महालक्ष्मी आदी ठिकाणच्या जम्बो सेंटरसाठी मिळून २५९ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसाठी ४० कोटी ९५ लाख, स्पेशालिटी रुग्णालयांसाठी १० कोटी ३० लाख तर उपनगरीय रुग्णालयांसाठी २९ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय पालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एक कोटी रुपये खर्च असा सुमारे ६१० कोटी रुपये आजपर्यंत पालिकेने खर्च केले आहेत.

सर्वेक्षणातून नियंत्रण शक्य

रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देताना खर्चाचाही बारकाईने विचार केला. यातूनच जम्बो सेवा, एका प्रयोगशाळेच्या चार प्रयोगशाळा, चाचण्यांची क्षमता वाढवणे, रक्तद्रव चाचणी, अ‍ॅन्टिबॉडी  चाचण्या, व्हेंटिलेटर, पल्सऑक्सिमीटरपासून अतिदक्षता विभागातील खाटांची  संख्या वाढवणे अशा अनेक गोष्टी केल्याचे काकाणी यांनी सांगितले. मुख्य म्हणजे महापालिके ने के लेले सर्वेक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. यातूनच मुंबईतील धारावीसह सर्व प्रमुख झोपडपट्टीमधील करोनाला आटोक्यात ठेवता आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. मुंबईत ठाणे जिल्ह्य़ातून मोठय़ा प्रमाणात गंभीर रुग्ण येतात हे लक्षात घेऊन मुलुंड येथील हजार खाटांच्या जंबो व्यवस्थेतील पाचशे खाटा ठाणे पालिका परिसरासाठी राखीव ठेवल्या तर दहिसर येथे पाचशे खाटा मीरा- भाईंदर व वसईपट्टय़ासाठी राखीव ठेवले. आज मुंबई महापालिकेकडे २१ हजार ८३५ खाटा आहेत. अतिदक्षता विभागातील १७७६ खाटा, ऑक्सिजन व्यवस्था असलेल्या ११ हजार २९७ खाटा व व्हेंटिलेटर असलेल्या १०८९  खाटा  आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 3:36 am

Web Title: mumbai municipal corporation spends rs 600 crore on corona battle zws 70
Next Stories
1 कर्ज घ्या, पण शुल्क भरा!
2 सर्वोत्कृष्ट २४ ‘स्टार्टअप्स’ना सरकारबरोबर कामाची संधी
3 मालवाहतूकदार अडचणीत, ६० टक्के व्यवसाय ठप्प
Just Now!
X