News Flash

अंबरनाथ : सफाईसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

परिसरात उडाली खळबळ

प्रातिनिधिक छायाचित्र

अंबरनाथमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. टाकीतील गॅसमुळे तिन्ही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून, अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या आयटीआयजवळील इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीची सफाई करण्यासाठी तीन कामगार उतरले होते. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कामगार सफाईसाठी उतरले. यात एकाची तब्येत बिघडल्यामुळे तो औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला होता. याच काळात तीन कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली. टाकीत असलेल्या गॅसमुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. हर्षद, बिंदेश आणि दिनेश अशी मृत कामगारांची नावं आहेत.

तिघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा बळी गेल्याचा आरोप आता केला जात आहे. कलरच्या कामासाठी बोलावून तिन्ही कामगारांना रसायनच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे कामगारांना नाका-तोंडाला बांधण्यासाठी विशेष मास्क दिले नव्हते. कामगारांनी कपडाच बांधलेला होता, असं घटनास्थळी असलेल्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 1:17 pm

Web Title: mumbai news ambernath three workers died suffocating while cleaning underground tank bmh 90
Next Stories
1 “वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं?, परमबीर सिंह यांची अटक टाळण्यात येत आहे का?”
2 दौऱ्यावरुन परतत असतानाच परेलमध्ये इमारतीला आग लागल्याचं पाहून नाना पटोले यांनी थांबवला ताफा; अन् त्यानंतर…
3 हिरेन प्रकरणी NIA कडून मोठा खुलासा; मृतदेह सापडल्यानंतर वाझेंनी केलं होतं असं काही…
Just Now!
X