28 February 2021

News Flash

मुंबईत रेल्वेरुळावर सापडले तिघांचे मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय

नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळील घटना

प्रातिनिधिक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

मुंबईतील नालासोपारा भागात मन विषण्ण करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, एक १० वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. नालासोपारा ते वसई लोहमार्गावर नालासोपारा स्थानकाजवळ ही ही घटना घडली. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शनिवारी नालासोपारा-वसई रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळावर दोन महिलांसह एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला. तर एक दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. नालासोपार स्थानकाजवळच ही घटना घडली. एकाच कुटुंबातील चौघांनी मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. यात सोमनाथ पोपट जंगम (वय ३१), नंदा पोपट जंगम (वय ५५) आणि प्रेमिला पोपट जंगम (वय ३५) हे जागीच ठार झाले. तर समीक्षा फडतरे ही दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. मालगाडीखाली चिरडले गेल्यानं तिघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न झाले. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह आणि जखमीला रुग्णालयात हलवले. मुलीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मयत विरारमधील पूर्व साईनाथ नगर येथील रहिवाशी आहेत.

प्रथमदर्शनी ही घटना अपघात असल्याचं दिसून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विरारमधील रहिवासी असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय वसई रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 4:23 pm

Web Title: mumbai news bodies of mother son found on railway tracks at nalasopara bmh 90
Next Stories
1 “महाराष्ट्रात जेव्हा ज्वलंत हिंदुत्ववाद्यांनी…”; भाजपा नेत्याचा शिवेसेनेला सवाल
2 “का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?”
3 “प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच”
Just Now!
X