महिनाभरानंतरही ‘२४ तास’ला थंड प्रतिसाद;  रेस्तराँ, कॉफी शॉप, पबमध्ये तुरळक ग्राहक

अमर शैला सदाशिव, लोकसत्ता

मुंबई : युरोप-अमेरिकेप्रमाणे मुंबईकरांनाही रात्री उशिरापर्यंत खरेदी आणि पेटपुजेचा आनंद लुटता यावा यासाठी सुरू झालेल्या ‘मुंबई २४ तास’ला  ग्राहकांकडून महिनाभरानंतरही थंड प्रतिसाद आहे. त्यामुळे ज्या काही मोजक्या व्यावसायिकांनी सुरुवातीच्या दिवसात या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला होता, त्यांचाही मध्यरात्री दुकाने खुली ठेवण्याचा उत्साह आटला आहे. त्यामुळे महिनाभरानंतरही रात्रीची मुंबई शांतच आहे.

पहिल्या दोन-तीन आठवडय़ांतच कपडे, पादत्राणे, घडय़ाळ, पर्स, भ्रमणध्वनी आदी वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी या संकल्पनेतून अंग काढून घेतले आहे. त्यातल्या त्यात रेस्तराँ, हॉटेल आदी खाद्यपदार्थाचे व्यावसायिक धंद्याच्या अपेक्षेने आस्थापने खुली ठेवत होते. परंतु, त्यांनाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना सुरुवातीला आठवडाभर न राबविता ‘विकेंड’पुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. ग्राहक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मॉलमध्ये रात्री उशिरा येऊन खरेदी करतील अशी आशा होती. मात्र त्याला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. मागील एक महिन्यापासून राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. गेल्या आठवडय़ात शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्री मॉलमधील सर्व दालने नेहमीप्रमाणे रात्री ११ पर्यंत बंद झाल्याचे दिसत आहे.

वरळी भागातील अटरिया मॉल, लोअर परेल येथील फिनिक्स मॉल, अंधेरीतील इन्फिनिटी मॉल यांनी शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी रात्री उशिरापर्यंत मॉल खुला ठेवला. मात्र मॉलमधील एक कपडय़ाचे दालन सोडल्यास तिन्ही मॉलमध्ये मिळून एकही दालन खुले नव्हते. हा उपक्रम सुरू झाला तेव्हा अटरियातील व्यावसायिक अशोक जैन यांनी रात्री १ पर्यंत दालन खुले ठेवले होते. मात्र ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता आपण नेहमीच्या वेळेतच दुकान बंद करतो, असे त्यांनी सांगितले. येथील ‘ज्युरी’ या दुकानाच्या मालकाचे मत वेगळे ठरले. मागील महिनाभरापासून विकेंडला दोन दिवस रात्री १.३० पर्यंत दुकान खुले होते. रात्री जेवणाची पार्टी झाल्यानंतर काही ग्राहक खरेदीसाठी येतात. मागील आठवडय़ात रात्री उशिरा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने १४ हजार रुपयांची खरेदी केल्याचे ज्युरीचे मालक अशोक चावला यांनी सांगितले. तसेच मोठय़ा व्यावसायिकांनी त्यांची दालने खुली ठेवल्यास अधिक ग्राहक खरेदीसाठी येतील, असे मत चावला यांनी व्यक्त केले. फिनिक्स मॉलमधील ‘सत्यपॉल’च्या मालकांनी ग्राहक असल्यासच खुले ठेवण्याचे ठरविले आहे. परंतु, ग्राहक  नसल्याने बरेचदा ते बंद असते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

रेस्तराँ, हॉटेल खुली असली तरी तिथेही संमिश्र प्रतिसाद होता. अटरियातील ‘मस्टर्ड’ रेस्तराँमध्ये मागील अवैध बांधकामे केली आहेत, असे समजते. त्याबाबत नेमके तपशील घेऊन इमारत बांधकामासाठी गुंतवणूक कोणी केली, ही रक्कम कोठून आणली, अवैध बांधकामासाठी जागा मालकास धमकावून स्वत:सोबत घेतले होते का, इमारत बांधकामासाठी किंवा मजले वाढवण्यासाठी महापालिकेची परवानगी होती का, नसल्यास महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही, याचा अभ्यास बारकाईने करून पुरावे गोळा केले जातील.

यातील काही प्रकरणांमध्ये दखलपात्र गुन्हे नोंद होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकरणांत गुन्हे नोंद होणार नाहीत त्या प्रकरणांची माहिती संबंधित यंत्रणांना दिली जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

अवैध इमारतीची प्रक्रिया

डोंगरी, पायधुनी भागात बहुमजली चाळींची संख्या मोठी आहे. या चाळींच्या मालकांना आमिष दाखवून, धमकावून ही दुकली स्वत:सोबत घेते. या इमारतीत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचा आकडा फुगवून महापालिकेसह अन्य यंत्रणांकडून परवानग्या मिळवल्या जातात. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात बनावट कागदपत्रे तयार केली जातात. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत सात ते आठ माळे अवैधरीत्या चढवले जातात. शनिवार, रविवार किंवा जोडून आलेल्या सुट्टय़ांमध्ये २४ तास अवैध बांधकाम सुरू राहते. ज्या जुन्या इमारतींचा पाया भक्कम नाही अशा इमारती जमीनदोस्त करून, पाया मजबूत करून त्यावर दहा ते बारा माळ्यांची इमारत उभी केली जाते.

पबचालकांचा उत्साह

‘मुंबई २४ तास’ या संकल्पनेचे इतर व्यावसायिकांपेक्षा पबचालक स्वागत करत आहेत. काही पब व्यावसायिक केवळ विकेंडलाच नव्हे तर संपूर्ण आठवडा पहाटे ४ पर्यंत पब खुले ठेवत आहेत. येथील मद्यविक्री रात्री १.३० नंतर बंद होते. संगीत, नृत्य आणि खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी तरुणाई पबमध्ये रात्री उशिरापर्यंत घुटमळते, अशी माहिती फिनिक्स मॉलमधील सोशल बार, अटारियातील ‘द साऊथ बॉम्बे बार’ येथील कर्मचाऱ्यांनी दिली. हे पब आठवडाभर मध्यरात्रीपर्यंत खुले असतात.

बेस्टही प्रवाशांच्या प्रतीक्षेत

‘मुंबई २४ तास’मध्ये नफ्याची संधी शोधणाऱ्या बेस्टचीही ‘अहोरात्र सेवा’ मुंबईकरांच्या प्रतिसादाअभावी सुरू झालेली नाही. महसुलवाढीच्या वाटा शोधत असलेल्या ‘बेस्ट’ला रात्रीच्या गजबजाटातून व्यवसायवृद्धीची आशा होती. त्यादृष्टीने ‘बेस्ट’ने दादर, लोअर परळ, मुंबई सेन्ट्रल याशिवाय कुर्ला, मुलुंडसह अन्य परिसरात या दृष्टीने आढावा घेतला होता. परंतु, येथील मॉल, दुकाने, चित्रपटगृहांना फारसा प्रतिसाद नसल्याचे आढळून आले.