27 January 2021

News Flash

मुंबईत १,४०० वीजचोर

अनधिकृत झोपडपट्यांमध्येही अवैध जोडणी करून वीज वापरली जाते.

मुंबई : वीजचोरांविरोधात बेस्ट उपक्र माने के लेल्या कारवाईत १,४०७ वीजचोरांकडून तब्बल साडेआठ कोटींची वसुली करण्यात आली. २०१९-२०२० मध्ये ही कारवाई के ल्याची माहिती बेस्ट उपक्र माने दिली.

बेस्टचा विद्युत विभागाला वीजचोरीचा नेहमीच फटका बसतो. छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांपासून घरगुती वीज वापरकत्र्यांकडून मीटरमध्ये फे रफार के लेले आढळतात, तर अनधिकृत झोपडपट्यांमध्येही अवैध जोडणी करून वीज वापरली जाते. अशा वीजचोरांवर बेस्टच्या विद्युत विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई के ली जाते. दक्षता विभागाने २०१८-१९ मध्ये १ हजार ६९५ वीजचोरांवर कारवाई के ली होती आणि ८ कोटी ७५ लाख दंड वसूल के ला. २०१९-२० मध्ये १ हजार ४०७ वीजचोर पकडण्यात आले आणि ८ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल के ल्याचे उपक्र माकडून सांगण्यात आले. अँटोप हिल, धारावी, दारूखाना, कर्णाक बंदर, कु लाबातील गीता नगर या भागांत सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. धारावीत प्लास्टिक वितळवून त्यापासून वस्तू बनवणारे काही कारखाने आहेत. येथे २४ तास काम चालते. प्लास्टिक वितळवण्यासाठी जास्त वीज लागत असल्याने येथे वीजचोरी होते. तसेच काही झोपड्यांमधूनही वीजचोरी होत असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:45 am

Web Title: mumbai one thousand four hundred power thief akp 94
Next Stories
1 देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाच टॅब
2 ‘बेस्ट’च्या मदतीसाठी आलेल्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय
3 माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत स्पष्टीकरणाचे आदेश 
Just Now!
X