News Flash

मुंबईत पेट्रोल शंभरीपार

राज्यांमध्ये स्थानिक मूल्यवर्धित कर वेगळा असल्याने इंधनाचे दर वेगवेगळे असतात

महिन्याभरातील १५वी दरवाढ

मुंबईत पेट्रोलच्या दराने शनिवारी शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दरात २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये १९ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये १७ पैसे झाले आहेत.

राज्यांमध्ये स्थानिक मूल्यवर्धित कर वेगळा असल्याने इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ९३ रुपये ९४ पैसे झाले असून डिझेलचे दर ८४ रुपये ८९ पैसे झाले आहेत. गेल्या ४ मेपासूनची ही १५वी इंधन दरवाढ आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी दरवाढ १८ दिवस रोखण्यात आली होती.  राजस्थानात श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०४.९४ पैसे लिटर असून डिझेल ९७ रुपये ७९ पैसे आहे.

वाढ किती? गेल्या महिन्याभरात १५ वेळा इंधनाची दरवाढ करण्यात आली आणि त्यात पेट्रोलचे दर तीन रुपये ५४ पैसे, तर डिझेलचे दर चार रुपये १६ पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 2:01 am

Web Title: mumbai petrol price hike akp 94
Next Stories
1 सुरक्षेसह हजारोंच्या आरोग्याचीही रक्षणकर्ती
2 इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर
3 मुंबई पालिका लससज्ज
Just Now!
X