08 March 2021

News Flash

बांगलादेशीयांकडून मुंबई पोलिसांना मारहाण

खारघर येथील ओवे गावात भाडय़ाने राहणाऱ्या घुसखोर बांगला देशीयांना अटक करण्यासाठी सोमवारी पहाटे अडीच वाजता गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर बांगलादेशीयांनी हल्ला करुन त्यांना मारहाण केली.

| February 26, 2013 03:10 am

खारघर येथील ओवे गावात भाडय़ाने राहणाऱ्या घुसखोर बांगला देशीयांना अटक करण्यासाठी सोमवारी पहाटे अडीच वाजता गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर बांगलादेशीयांनी हल्ला करुन त्यांना मारहाण केली. यात पोलीस उपनिरीक्षक सुभाष बांदेकर व पोलीस नाईक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहा बांगलादेशीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांगलादेशीय घुसखोर असून  मुंबई पोलिसांच्या आय युनिटवर परदेशातील घुसखोरांना अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या युनिटला खारघर येथील ओवे गावात मोठय़ा प्रमाणात बांगलादेशीय घुसखोर असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यामुळे उपनिरीक्षक बांदेकर  पथकासह ओवे गावी येऊन धडकले. त्यांनी या बांगलादेशीयांना जागे केले असता त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पोलिस असल्याचे सांगूनही हे घुसखोरांना दगडफेक करण्याचे थांबविले नाही. या हल्यात बांदेकर व हांडे जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 3:10 am

Web Title: mumbai police are biten by bangladesh peoples
टॅग : Bangladesh
Next Stories
1 नवी मुंबई बिल्डर हत्याप्रकरणी गुन्हेगारी जगताकडे संशय
2 रेल्वे अर्थसंकल्प २०१३ : मुंबईत धावणार एसी लोकल
3 रेल्वे प्रवास महागणार!
Just Now!
X