आश्रित दुष्काळग्रस्तांना मुंबई पोलिसांच्या माणुसकीचा प्रत्यय
पोलिसी अत्याचारांच्या अनेक कहाण्या आपण अनेकदा असतो; पण, अनेकदा समाजातील लोकांना पोलिसांचा मानवतावादी चेहराही दिसतो. नांदेडच्या मुखेड गावातूनही ३५ ते ४० कुटुंबे मुंबईतील घाटकोपरमध्ये शुक्रवारी दाखल झाली. मात्र, या कुटुंबांना एकीकडे पाणी मिळवण्यास अडचण येत असतानाच स्थानिक गुंडांनी त्यांच्याकडून हप्तेखोरी करण्याबरोबरच गर्दुल्ल्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, घाटकोपरच्या रामजीनगर पोलीस चौकीतील पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी या नागरिकांना होणारा त्रास बंदोबस्त लावून तर मिटवलाच, पण अवघ्या ३० मिनिटांत नागरिकांसाठी टँकर उपलब्ध करून दिला. पोलिसांनी केलेल्या या मदतीनंतर आता राजकारण्यांच्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
एप्रिल महिना उजाडला असतानाच ग्रामीण भागात थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याअभावी अनेक उद्योगही बंद पडले असल्याने बेरोजगारीही वाढली आहे. त्यामुळे, अनेक कुटुंबे मुंबई-पुणे या शहरांकडे धाव घेत आहेत. दुष्काळझळा तीव्र झाल्याने नांदेडच्या मुखेड गावातील ३५ ते ४० कुटुंबे मुंबईतील घाटकोपरच्या रामजीनगरमधील मैदानात दाखल झाले आहेत. पण, जवळपास २५० नागरिकांसाठी पाणी कुठून आणायचे, हा प्रश्न उभा ठाकला होता. त्यातच, शनिवारी सायंकाळी या कुटुंबांकडे काही समाजकंटकांनी पैसे मागत त्रास देण्याचाही प्रयत्न केला. रामजीनगर पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही गोष्ट घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांना समजली.
त्यांनी परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दोन टँकरची व्यवस्था या नागरिकांसाठी केली. तसेच, चौकीतील पोलिसांना या कुटुंबीयांना कोणीही त्रास देणार नाही, याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी गस्त घालण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या मदतीविषयी कळताच रविवारपासून या कुटुंबांना अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे.
३५ ते ४० कुटुंबे मुंबईतील घाटकोपरच्या रामजीनगरमधील मैदानात दाखल झाले आहेत. पण, जवळपास २५० नागरिकांसाठी पाणी कुठून आणायचे, हा प्रश्न उभा ठाकला होता. त्यातच, शनिवारी सायंकाळी या कुटुंबांकडे काही समाजकंटकांनी पैसे मागत त्रास देण्याचाही प्रयत्न केला. रामजीनगर पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही गोष्ट घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांना समजली.
त्यांनी परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दोन टँकरची व्यवस्था या नागरिकांसाठी केली. तसेच, चौकीतील पोलिसांना या कुटुंबीयांना कोणीही त्रास देणार नाही, याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी गस्त घालण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या मदतीविषयी कळताच रविवारपासून या कुटुंबांना अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे.

जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा
या परिसरात रहायला आलेल्या कुटुंबाना पाणी आणि सुरक्षा आदींची वानवा असल्याने त्यांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी पुढील दोन महिन्यांसाठी या दुष्काळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे आश्वासन दिले. येथे आलेल्या कुटुंबांचा सव्र्हे करून त्यांना ओळखपत्र देण्याची व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी सांगितले.