25 September 2020

News Flash

मुंबईत अटक केलेल्या ‘त्या’ महिला दाऊद टोळीच्या ‘खबरी’ निघाल्या!

ऑर्थर रोड कारागृहात झाली गुंडांशी ओळख

दाऊद इब्राहिम. (संग्रहित छायाचित्र)

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या दोन महिलांना मुंबईतून ताब्यात घेतले आहे. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम आणि शार्प शुटर रामदास रहाणे याला ‘टीप’ देण्याचे काम या महिला करत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

रिझवाना शेख आणि अश्विनी रणित या दोघींना दाऊद टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून रविवारी अटक केली होती. या दोघी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम आणि शार्प शुटर रामदास रहाणे याला माहिती पुरवण्याचे काम करत होत्या. फेब्रुवारीतच रामदास आणि त्याच्या तीन साथीदारांना राजकोट येथील व्यापाऱ्याची हत्या करण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली होती. रिझवाना ही मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात कैदी असलेल्या मुलाला भेटायला जात असे. त्याच दरम्यान, ती अनीसचा साथीदार दशरथ राणे याच्या संपर्कात आली. दशरथने तिची ओळख आपल्या टोळीतील इतर सहकाऱ्यांशी करून दिली. त्यानंतर तिच्या भेटीगाठी वाढू लागल्या. त्यानंतर ती त्यांना अंडरवर्ल्डमधील काही ‘गुप्त माहिती’ द्यायला लागली. तर घरकाम करणाऱ्या अश्विनीने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. दाऊद टोळीकडून पैसा घेण्यासाठी ती या क्षेत्रात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दाऊद टोळीतील गुंड अश्विनीच्या बँक खात्यात पैसे जमा करत होते. या माध्यमातून ती शार्प शूटर रामदास रहाणेला पैसा पाठवत होती. त्यात अश्विनी आणि रामदास हे दोघेही पती-पत्नी असल्याचे लोकांना भासवत होते. या दोघांनी राजकोटमधील व्यापाऱ्याची हत्या करण्यासाठी एकत्रितपणे रेकीही केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिझवाना हिला जोगेश्वरी आणि अश्विनीला टिळक नगरमधून अटक केली.

…आणि रिझवाना बनली ‘इन्फॉर्मर’

एका खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्या मुलाची भेट घेण्यासाठी रिझवाना मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात जात असे. त्याचवेळी अनीससाठी काम करणारा त्याचा साथीदार दशरथ राणे याच्याशी तिची ओळख झाली. त्याने रिझवानाची अनीस आणि टोळीतील इतर साथीदारांशी ओळख करून दिली. त्यानंतर ती गुन्हेगारी जगतातील माहिती अनीस आणि दाऊद टोळीशी संबंधित गुंडांना देऊ लागली. पण असे करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, तिला राजकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तर अश्विनीही ऑर्थर रोड कारागृहात असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जात असे. तिथे तिची ओळख शार्प शूटर रहाणे याच्याशी झाली. त्यानंतर ती दाऊद टोळीसाठी काम करू लागली. रहाणे तिच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करत असे. दाऊद टोळीतील आपल्या सहकाऱ्यांना हवे तेव्हा ती या बँक खात्यातून पैसे देत असे, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2017 6:20 pm

Web Title: mumbai police arrested two women passing information from dawood gang
Next Stories
1 जागतिक महिला दिन : ही दहा वाक्ये तुमच्यातील वेगळेपण कायम जपतील..
2 म्हाडाचा एफएसआय न देणाऱ्या विकासक, अधिकाऱ्यांची एसआयटीकडून चौकशी
3 मोबाईल वापरताना सात मजली इमारतीवरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू
Just Now!
X