25 February 2021

News Flash

बनावट दस्तावेजांनिशी वाहन खरेदी करून विक्री

टोळीच्या म्होरक्यासह सात जणांना अटक

राज्यभरातून १९ महागडय़ा गाडय़ा जप्त; टोळीच्या म्होरक्यासह सात जणांना अटक

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक, खासगी वित्त संस्थांकडून कर्ज मिळवून विकत घेतलेल्या महागडय़ा गाडय़ा अन्य राज्यात विकणारी टोळी गुन्हे शाखेने गजाआड केली. या टोळीने विकलेल्या, गहाण ठेवलेल्या १९ गाडय़ा विविध राज्यांतून जप्त करण्यात आल्या. त्यात मिनी कुपर, मर्सिडीज बेंझ, ऑडी, एमजी हेक्टर फॉच्र्युनर आदी कारचा समावेश आहे.

आरोपींनी आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब अ‍ॅण्ड नॅशनल, स्टेट बँक आणि दोन खासगी वित्त संस्थांना आधार कार्डपासून आयकर परताव्यापर्यंतची बनावट कागदपत्रे सादर करून गाडय़ा विकत घेण्यासाठी कर्ज मिळवले. गाडय़ा मिळताच त्या कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये कमी किमतींना विकल्या किंवा गहाण ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली.

याप्रकरणी टोळीच्या म्होरक्यासह सात आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. टोळीच्या म्होरक्यावर बनावट कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी होती, तर अन्य आरोपींकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळवून कार खरेदी करणे, परराज्यांतील ग्राहक किंवा गाडी गहाण ठेवून पैसे देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे आदी कामे वाटून देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक वाहने विकत घेतली, कर्जाचे हप्ते बुडवून बँक किंवा खासगी वित्त संस्थांची आणि परराज्यांतील ग्राहकांची फसवणूक केली. त्यापैकी १९ गाडय़ा आतापर्यंत ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अटक आरोपींकडे चौकशी करून अन्य साथीदार, वाहनांबाबत माहिती मिळवली जात असल्याचे जाधव यांनी सांगितले.

प्रदीप मौर्य हा या टोळीचा म्होरक्या असून तो कर्ज मिळवून देणारा दलाल आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती कर्ज मिळविण्यासाठी मौर्यला संपर्क साधत होते. सीबील स्कोर कमी असल्याने कर्ज मिळवणे अडचणीचे ठरेल, प्रयत्न करू, अशी थाप मारत तो अनेक व्यक्तींची कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेत होता. त्याआधारे तो एका व्यक्तीचे नाव, अन्य व्यक्तीचे छायाचित्र अशी सरमिसळ करून बनावट कागदपत्र तयार करायचा. त्याचा एक साथीदार पूर्वी बँके त नोकरी करीत होता. त्यामुळे कर्ज देताना बँक, वित्त संस्था कशाप्रकारे कागदपत्रांची पडताळणी करतात ही बाब त्याला ठाऊक होती, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून कर्ज देणारे बँक अधिकारी, गाडी वितरकांचीही चौकशी करण्यात येणार आहेत.

कोऱ्या स्मार्ट कार्डवर ‘आरसी बुक’

आरोपी ‘अ‍ॅमेझॉन’वरून कोरे स्मार्ट कार्ड मागवून ते आरसी बुक वाटावीत अशाप्रकारे त्यावर छपाई करून घेत होते, असे तपासातून स्पष्ट झाल्याचे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:00 am

Web Title: mumbai police arrests gang who selling vehicles on fake documents zws 70
Next Stories
1 मेट्रोची चालकविरहित रेल्वेगाडी मुंबईत येण्यास सज्ज
2 ‘मेट्रो ४’च्या डब्यांसाठी बम्बार्डियर 
3 बीडीडी पुनर्वसन खर्चात २,५०० कोटींची वाढ
Just Now!
X