26 September 2020

News Flash

नवोदित अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणारी महिला अटकेत

दोन अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलाल महिलेला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे.

मुंबई : ‘वेब सीरिज’मध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन अभिनेत्रीसह टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अन्य दोन अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलाल महिलेला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. प्रिया बाबुराम शर्मा (२९) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तर आरोपी कुलदीप जेनी, आवेश आणि विनय हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

कुलदीप जेनी, आवेश आणि विनय हे दिल्ली येथे राहतात. प्रिया हिच्या मदतीने ते मुंबईत वेश्याव्यवसाय चालवत होते. याबाबत मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला खबऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांकरवी प्रियाकडे मुलींची मागणी केली. त्यानुसार अंधेरीतील ‘ड्रॅगनफ्लाय हॉटेल’ येथे मुलींना आणताच बनावट ग्राहकाने त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा टाकून तीन अभिनेत्रींची सुटका केली. तर याप्रकरणी प्रिया हिला अटक केली आहे.

प्रिया हिचा ‘विनायक व्हेकेशन अ‍ॅण्ड हॉलीडेज’ या नावाचा टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या माध्यमातूनच इतर आरोपींसह तिने या अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ओढले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात प्रिया आणि तिच्या साथीदारांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 12:08 am

Web Title: mumbai police bust high profile sex racket in mumbai hotel zws 70
Next Stories
1 भाजप सरकारच्या काळातील पाटबंधारे महामंडळांवरील राजकीय नियुक्त्या रद्द
2 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ‘नाईट लाईफ’
3 विचार महाराष्ट्र धर्माचा! निर्धार हिंदवी स्वराज्याचा! मनसेचं नवं पोस्टर
Just Now!
X