शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आलेल्या मजूर आणि कंत्राटदारांची चारित्र्य आणि पत्त्याची पडताळणी करण्यात आली. १ मे हा राज्याचा स्थापना दिवस. या दिनाचा मुख्य कार्यक्रम दरवर्षी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात येतो. तेथे कवायती आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी मुख्यमंत्र्यासहीत अनेक राष्ट्रांचे उच्चायुक्त, वरिष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे हा परिसर अतिशय संवेदनशील बनतो. यामुळे पोलिसांनी यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष खबरदारी घेतली आहे. या ठिकाणी मंडप उभारणारे कंत्राटदार, मजूर, वाहतूक व्यवस्था बघणारे, कॅटरिंग कर्मचारी या सर्वाची चारित्र्यपडताळणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानाच्या पत्त्याचीही पडताळणी करण्यात आली आहे. यापैकी कुणी गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत का किंवा त्यांची पाश्र्वभूमी काय आहे हे तपासण्यात आल्याती माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (संरक्षण) मधुकर पांडे यांनी दिली. हे काम कठीण आणि अनावश्यक वाटत होते. पण सुरक्षेच्या बाबतीच कसलीच तडजोड नको, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 4:36 am