मुंबई : केंद्र सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना शुक्रवारी दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बर्वे यांची मुदतवाढ ३० नोव्हेंबरला संपुष्टात येत होती. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता तीन महिने तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती असलेले बर्वे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी निवृत्त होणार होते. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. मात्र बर्वे यांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविषयक समितीमध्ये बर्वे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.