09 August 2020

News Flash

नवजात अर्भकाला फेकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

डिम्पल वरठे असे या महिलेचे नाव आहे. डिम्पल सध्या रुग्णालयात दाखल आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : इमारतीच्या १७व्या मजल्यावरून खाली फेकत नवजात बालिकेची हत्या करणाऱ्या महिलेविरोधात कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पतीसोबतच्या वादातून निर्माण झालेल्या क्षणिक रागाच्या भरात तिने हे कृत्य केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

डिम्पल वरठे असे या महिलेचे नाव आहे. डिम्पल सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिची प्रकृती सुधारल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे कांदिवली पोलिसांनी सांगितले. डिम्पलचे पतीशी वाद होते. पती बाहेरख्याली आहे, या संशयावरून वाद सुरू होते. गुरुवारीही दोघांमध्ये वाद झाले. घरीच प्रसूत झालेल्या डिम्पलला राग अनावर झाला आणि त्याच भरात तिने नवजात बालिकेला स्वच्छतागृहाच्या खिडकीतून खाली फेकले. हा प्रकार घडला तेव्हा डिम्पलची नणंद घरी होती. मात्र तिला असे काही घडेल याची कल्पना नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 12:01 am

Web Title: mumbai police file case against woman who threw a newborn baby zws 70
Next Stories
1 …हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल: राज ठाकरे
2 “शिवरायांना अभिप्रेत असणारा न्याय पोलिसांनी पीडितेला मिळवून दिला”
3 “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार”
Just Now!
X