News Flash

कमला मिल अग्नितांडव : मुंबई पोलिसांकडून बारा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

१२ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

कमला मिल कंपाऊंडमधील आगीचे संग्रहित छायाचित्र

मुंबईतील १४ जणांचा बळी घेणाऱ्या कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव प्रकरणी मुंबई पोलिसांनी भोईवाडा कोर्टात बुधवारी आरोपपत्र दाखल केले. २ हजार ७०० पानांच्या या आरोपपत्रात १२ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


गेल्या वर्षी २९ डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल्स कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजो ब्रिस्टो या रेस्तराँना भीषण आग लागली होती. ही आग संपूर्ण इमारतीत पसल्याने यात १४ जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या रेस्तराँच्या मालकांसह १२ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या १२ जणांविरोधात आज पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, युग पाठक, अभिजीत मानकर, रमेश गोवानी, रवी भंडारी, राजेंद्र पाटील, उत्कर्ष विनोद यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 10:54 pm

Web Title: mumbai police filed chargesheet in kamala mills fire incident against one above mojos bistro and owners
Next Stories
1 छातीत दुखू लागल्याने दिग्दर्शक राजकुमार संतोषी रुग्णालयात दाखल
2 जवानांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे
3 मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
Just Now!
X