‘फॉलोअर’ विकत घेणाऱ्यांची ओळख पटली

मुंबई : फॉलोअर्सकार्ट या संकेतस्थळामार्फत हजारो बनावट फॉलोअर विकत घेणाऱ्या १७६ जणांमध्ये मुंबई, अहमदाबादसह देशभरातील चित्रपट आणि मालिका विश्वातील तारे-तारका, छायाचित्रकार, निर्माते आणि नृत्य कलाकारांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. ओळख पटलेल्या सर्वाकडे गुन्हे शाखेचे विशेष पथक चौकशी करणार आहे.

या संकेतस्थळाने समाजमाध्यमांवर अस्तित्व असलेल्या, नसलेल्या व्यक्तींचे नाव, छायाचित्र आणि वैयक्तिक तपशिलांचा वापर करून फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आदी अ‍ॅपवर लाखो बनावट खाती तयार केली. ती खाती या व्यक्तींना मोठी रक्कम स्वीकारत फॉलोअर म्हणून उपलब्ध करून दिली. समाजमाध्यमांवर एखादी व्यक्ती फॉलो करते तेव्हा त्याची नोंद किं वा माहिती संबंधित व्यक्तीला मिळते. मात्र या प्रकरणात फॉलोअर्सकार्ट संकेतस्थळाने अ‍ॅपची सुरक्षा प्रणाली भेदून फॉलोअर, लाइकची संख्या कृत्रिमरित्या फु गवली. विशेष पथकाने कुर्ला परिसरातून या संके तस्थळासाठी रिसेलर म्हणून कार्यरत अभिषेक देवडे(२१) या तरुणाला अटक केली. गुन्ह्य़ात संकेतस्थळाचे मालक, चालकासह अधिकारी वर्गाला आरोपी केले आहे. फॉलोअर्सकार्ट संकेतस्थळाचा सव्‍‌र्हर फ्रान्समध्ये आहे, अशी माहिती विशेष पथकाला आरोपीच्या चौकशीतून मिळाली. अशा अन्य ५४ संकेतस्थळांबाबतही तपास सुरू आहे.  याबाबत गुन्हे शाखेचे उपायुक्त नंदकु मार ठाकू र यांच्याकडे विचारणा के ली असता त्यांनी तपासाशी संबंधित तपशील देण्यास नकार दिला.

आंतरराष्ट्रीय टोळीचे प्रकरण

आरोपी अभिषेक याने पाश्र्वगायिका भूमी त्रिवेदी यांचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून फॉलोअर, लाइकचे प्रमाण परस्पर फु गवले. चित्रपट, मालिकांशी संबंधीत व्यक्तींची भेट घेऊन त्यांना या आरोपीने भूमी यांचा दाखला म्हणून त्यांचे इन्स्टाग्राम खाते दाखवले. भूमी यांच्याप्रमाणे तुम्हालाही फॉलोअर वाढवायचे आहेत का, अशी विचारणा केली. ही बाब समजताच भूमी यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रोर केली. सिंग यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेचे उपायुक्त नंदकु मार ठाकूर यांच्याकडे सोपवून गुन्हेगारी गुप्तवार्ता अणि सायबर सेलमधील निवडक अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आणि आंतरराष्ट्रीय टोळीचे प्रकरण उघडकीस आणले.