पनवेलला अडकून पडलेला औषधसाठा पोलिसांच्या सहकार्याने मुंबईत

मुंबई : पनवेलला अडकू न पडलेली औषधे पोलिसांनी समन्वय साधून गिरगाव येथे वास्तव्यास असलेल्या कर्करोगग्रस्त महिलेला पोचती के ली. टाळेबंदीमुळे कुरिअर कंपनीच्या पळस्पे कार्यालयात अनेक दिवस ही औषधे अडकून पडली होती. कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी ती वेळेत हाती पडणे आवश्यक होते.

भाग्यश्री पाटकर असे या महिलेचे नाव असून त्या मूळच्या रत्नागिरीच्या लांजा ताुलक्यात वास्तव्यास आहेत. त्यांचे पती भास्कर गेल्या काही वर्षांपासून गिरगावातल्या कॅटिरग व्यावसायिकाकडे मजुरी करतात. मंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने आणि भाडय़ाने खोली घेण्याची ऐपत नसल्याने भाग्यश्री यांना गावी ठेवून भास्कर कॅटिरग व्यावसायिकाच्या कार्यालयातच राहात असत. सहा महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान होताच त्यांनी भाग्यश्री यांना मुंबईत आणले. टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महिन्याकाठी सुमारे ९५ हजार रुपयांची औषधे लागतात. हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्था महिन्याकाठी आवश्यक असलेली सर्व औषधे मोफत पुरवते. फक्त संस्थेकडून ही औषधे लांजातील घरी पोच के ली जातात. संस्थेने पाठवलेली औषधे टाळेबंदीमुळे पनवेलच्या पळस्पे येथील कु रियर कं पनीच्या कार्यालयात अडकू न पडली. आम्ही ती तेथून मिळवण्यासाठी पाठपुरावा के ला. मात्र कु रिअर कं पनीने नियमांना बगल देत ती देण्यास नकार दर्शविला, असे भास्कर यांनी सांगितले.

डॉक्टर के मोथेरेपी टाळून या औषधांद्वारे इलाजावर भर देत होते. मात्र औषधेच अडकू न पडल्याने अखेर त्यांना के मोथेरेपी सुरू करावी लागली. त्याचा भाग्यश्री यांना बराच त्रास होऊ लागला. त्यामुळे लवकरात लवकर औषधे मिळवावीत यासाठी भास्कर धडपड करत होते. परिसरात वास्तव्यास असलेले सरकारी वकील अ‍ॅड. महेश मुळे यांना पाटकर दाम्पत्याची अडचण लक्षात आली. त्यांनी तातडीने नवी मुंबईत नेमणुकीस असलेल्या सहायक पोलीस आयुक्तांच्या कानी ही बाब घातली. औषधे मिळावीत, अशी विनंती के ली. या सहायक आयुक्ताने कु रिअर कं पनीसोबत पाठपुरावा करून अवघ्या काही मिनिटांत औषधांचा साठा पळस्पेहून नवी मुंबईत कर्तव्यावर येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याकरवी वाशीपर्यंत मागवला. पुढे वाशीतून हा औषधसाठा शिवडी पोलीस ठाण्यापर्यंत आणला गेला. नवी मुंबईत वास्तव्यास असलेला आणि शिवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने हा औषधसाठा वाहून आणला होता. भास्कर यांनी शिवडी पोलीस ठाण्यातून हा ओषधसाठा ताब्यात घेतला. इतके  दिवस पाठपुरावा निष्फळ ठरत होता. पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासांत औषधसाठा मिळवून दिला, अशी प्रतिक्रि या भास्कर यांनी दिली.