अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरु आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना दिली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने सुरु आहे असं त्यांनी एएनआयला सांगितलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरुन गेली. सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सुशांत हा सिनेसृष्टीतील गटबाजीचा बळी ठरला अशी टीका सुरु झाली. त्याला आत्महत्येसाठी भाग पाडण्यात आलं असंही काहींनी म्हटलं. ज्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

आणखी वाचा- सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास कुठवर आला आहे, आतापर्यंत किती आणि कोणाचे जबाब नोंदवले गेले, यांसारख्या मुद्द्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात बिहार पोलिसांनीही लक्ष घातलं आहे. बिहार पोलिसांनी मुंबईत येत अंकिता लोखंडेची चौकशीही केली.

आणखी वाचा- सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित होते का? मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले…

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत ३५ पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. १४ जून रोजी सुशांत सिंहने आत्महत्या केली. त्यानंतरही हे प्रकरण संपताना दिसत नाहीये. आता हे सगळं प्रकरण नेमकं कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.