आक्षेपार्ह चित्रफिती पसरवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित; चार गुन्हे नोंद, ११ तरुणांना बेडय़ा

मुंबई : करोनाशी लढणाऱ्या शासकीय यंत्रणांबाबत विडंबनात्मक ध्वनिचित्रफिती टिकटॉक अ‍ॅपवरून सर्वदूर पसरवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा बहुतांश चित्रफितींद्वारे प्रतिबंधात्मक निर्बंध झुगारण्यासाठी चिथावणी दिली जात आहे, हे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी टिकटॉकवर लक्ष केंद्रित के ले. आतापर्यंत शहरातल्या विविध पोलीस ठाण्यांत आक्षेपार्ह चित्रफिती टिकटॉकवरून सर्वदूर पसरवल्याबाबत चार गुन्हे नोंद के ले गेले. त्यात एकू ण ११ तरुणांना बेडय़ा ठोकण्यात आल्या.

डोंगरी पोलिसांनी या कारवाईची सुरुवात के ली. डोंगरी अरबींची असून इथे मिजास त्यांचीच, पोलिसांची नव्हे असा संवाद असलेली आणि पोलिसांच्या विरोधात टिप्पणी करणारी चित्रफीत टिकटॉकवरून प्रसारित झाल्याचे लक्षात येताच डोंगरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत ती तयार करणाऱ्या दोन तरुणांना बेडय़ा ठोकल्या. विशेष म्हणजे ही चित्रफीत चित्रित करताना आरोपींनी मास्क लावलेला नव्हता. डोंगरीपाठोपाठ शिवाजीनगर पोलिसांनी ‘आम्ही सेलेब्रिटी आहोत, आमच्यावर कोण कारवाई करणार’ अशी विचारणा करत रस्त्यांवरून विनामास्क लावत परिसरात मुक्त संचाराचे चित्रण असलेली चित्रफीत हेरली. खबऱ्यांना कामाला लावून पोलिसांनी ही चित्रफीत तयार करणाऱ्या सलीम शेख आणि फहाद शेख या दोन तरुणांना अटक के ली.

अ‍ॅन्टॉप हिल परिसरात तर रस्त्याकडेला उभ्या पोलीस वाहनाचा वापर करून आक्षेपार्ह चित्रफीत तयार के ली गेली. यातील एक तरुण पोलीस वाहनाला उद्देशून म्हणजे चालकाजवळील खिडकीकडे हातवारे करून ‘एक जीप त्या गल्लीत घातली ती बाहेर काढायला पाच दिवस लागले,’ असे म्हणताना दिसतो. ही चित्रफीत टिकटॉकवरून सर्वदूर पसरली.  एका सतर्क नागरिकाने मुंबई पोलिसांना ट्वीटद्वारे या चित्रफितीबाबत अवगत के ले. चौकशी करता ही चित्रफीत अ‍ॅन्टॉप हिल परिसरात तयार के ली गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी साहिल सरदार, राज निर्माण या आरोपींना अटक के ली. या गुन्ह्य़ात सहभाग स्पष्ट झालेल्या अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांनी दिली. वांद्रे-कु र्ला संकु ल पोलिसांनीही आक्षेपार्ह चित्रफितीप्रकरणी अविनाश वर्मा, जलीस सिद्दिकी, सलमान शेख, साजिद शेख, नफीज अन्सारी या तरुणांना अटक के ली.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांविरोधात टिप्पणी आणि मास्क न लावता स्वैर भ्रमंती चित्रित असून त्याद्वारे इतरांना चिथावण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट के ले.

राज्यात २५८ गुन्ह्य़ांची नोंद

करोना संसर्ग, उपचार, बाधितांबाबत समाजमाध्यमांवरून अफवा, दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे साहित्य पसरवणाऱ्यांविरोधात राज्यात एकू ण २५८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी ११४ प्रकरणांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, ९० प्रकरणांत फे सबुक तर सहा प्रकरणांत टिकटॉकचा गैरवापर के ला गेला. दाखल गुन्ह्य़ांमध्ये अद्याप ५७ आरोपींना अटक करण्यात आल्याचे राज्याच्या सायबर विभागाने सांगितले.