मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ या साथीच्या आजारांनी मुंबईला वेढले असताना स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूने मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. दिलीप शिंदे असे त्यांचे नाव आहे. मुंबई वाहतूक विभागात ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

मुंबईत कार्यरत असलेल्या दिलीप शिंदे यांना होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. उपचार सुरु असतानाच मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. दिलीप शिंदे हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. १९८७ मध्ये पोलीस दलात ते उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. मुंबईतील सांताक्रूझ, माहिम आणि धारावी पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले होते.