News Flash

मुंबईतील धक्कादायक घटना, पतंगाच्या मांजाने चिरला पोलिस अधिकाऱ्याचा गळा

पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने मुंबईत सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरला

(फोटो सौजन्य, फेसबुक- पुरुषोत्तम दगु आव्हाड)

पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने सहायक पोलिस निरीक्षकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पोलिस अधिकाऱ्याचे प्राण वाचले. पोलिस अधिकारी दुचाकीवरून जात असताना ही धक्कादायक घटना घडली.

वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असतानाच अचानक नायलॉनचा मांजा गळ्याजववळ आला, पण दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना लगेचच जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तत्काळ पुढील उपचार मिळावेत यासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. वेळ न गमावता त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रीय करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले पण सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

गेल्या आठवड्यात नाशिकमध्येही एक २३ वर्षांचा तरुण मांजामुळे जखमी झाला होता. तर, नागपूर शहरातही काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षांच्या मुलाचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आणि तो गंभीर जखमी झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 8:57 am

Web Title: mumbai police officers throat slit by kite string nylon manja sas 89
Next Stories
1 लसीकरण पुन्हा सुरू!
2 देवाच्या दारात अंतर नियम पायदळी
3 पालिके ला सीबीएसई मंडळाच्या शाळांची ओढ
Just Now!
X