News Flash

संदीप पाटील यांचं फेक सोशल अकाऊंट, मागितले क्रिकेटर्सचे नंबर

पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत

संग्रहित फोटो

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचं फेक सोशल अकाऊंट तयार करुन त्यावरुन काही क्रिकेटर्सना नंबर मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संदीप पाटील हे निवड समितीचे माजी अध्यक्षही आहेत. त्यांचे बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करुन काही क्रिकेटर्सना त्यांचे नंबर मागण्यात आले. मुंबई पोलिसांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी तातडीने अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

संदीप पाटील यांचं बनावट सोशल मीडिया अकाऊंट कोणी तयार केलं ते समजू शकलेलं नाही त्याचमुळे पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच कोणत्या क्रिकेटर्सना त्यांचे नंबर मागण्यात आले याचीही माहिती समोर आलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:08 pm

Web Title: mumbai police registers a case against unknown persons for making a fake social media account of former india batsman and chairman of selectors sandeep patil scj 81
Next Stories
1 अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान
2 Video : ‘अरे… माझी बाटली गेली कुठे?’; टेनिस कोर्टवर फेडररची फजिती
3 US Open : भारताच्या सुमित नागलने फेडररला झुंजवले
Just Now!
X