मुंबई : सर्व सूचना धाब्यावर बसवत टाळेबंदीत अडकून पडलेल्या मजुरांनी वांद्रे येथे के लेल्या गर्दीबद्दल नोंद गुन्ह्य़ातून वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कु लकर्णी यांना तूर्तास मुक्त करावे, अशी विनंती शनिवारी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी अंतिम तपास अहवाल वांद्रे पोलिसांनी न्यायालयात सादर के ला. त्यात कुलकर्णी यांचा गुन्ह्य़ाशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट झालेला नाही, असे नमूद के ले.

मजुरांना गावी जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाडय़ांच्या व्यवस्थेबाबत कु लकर्णी यांनी वृत्त दिले होते. या वृत्तानेच वांद्रे येथे सुमारे हजार ते बाराशे मजूर जमा झाले, असा आरोप वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्यावर ठेवला होता.  मात्र प्रकरणातील साक्षीदारांनी विशेष रेल्वेगाडय़ा सुटणार, असे ऐकले होते. कु लकर्णी यांचे वृत्त पाहिलेले नव्हते, असे समोर आले. तर वृत्तात विशेष रेल्वेगाडय़ा कधी, कु ठून सुटणार हे तपशील नव्हते.