अश्लील चित्रपट बनवण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राज कुंद्रा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज कुंद्रा यांच्या विरोधात पोलिसांना अनेक नवीन पुरावे सापडले आहेत. त्यावरून पोलिसांना विश्वास आहे की, राज कुंद्रा अश्लील चित्रपटांचा व्यवसाय करत होता. अलीकडेच गुन्हे शाखेला अनेक प्रॉडक्शन हाऊसचे ७० अश्लील व्हिडिओ मिळाले आहेत, जे राज कुंद्राच्या माजी पीए उमेश कामत यांनी शूट केले आहेत.

आता राज कुंद्राने आपली यूकेस्थित शेल कंपनी किनिन अश्लील सामग्री अपलोड करण्यासाठी वापरली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखा लवकरच हा पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवेल.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

 “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केलाय. कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची म्हणजेच पॉर्नची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईचं समर्थन करताना केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केलाय.

नक्की वाचा >> “Porn Vs Prostitution वर बोलूयात, कॅमेरासमोरच्या सेक्ससाठी…”; राज कुंद्रांचं ‘ते’ ट्विट व्हायरल

पोडा यांनी राज यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा केलाय. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवताना (संभोग करतानाचे) साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न असं म्हणतात. इतर सर्व साहित्याला अश्लील असं म्हणता येईल, असा युक्तीवाद वकिलांनी केला.