News Flash

सचिन वाझे यांच्या बडतर्फीसाठी हालचाली

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला.

मुंबई : उद्योगपती मुके श अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक के ल्यानंतर मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. आता त्यांना बडतर्फ करण्याच्या दृष्टीने आयुक्तालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला.

अंबानी यांना धमकी, व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएसह राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून(एटीएस) मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने माहिती मागवली होती. या दोन्ही यंत्रणांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून वाझे यांचा सहभाग स्पष्ट करणारे टिपण आयुक्तालयास दिले आहे. या तपशिलांचा सारासार विचार करून वाझे यांना बडतर्फ करण्याच्या हालचाली आयुक्तालयात सुरू असल्याचे समजते आहे. याबाबत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न के ला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके  ठेवण्याचा कट आखणे, या कटाची अंमलबजावणी करणे, तपास सुरू होताच पुरावे नष्ट करणे आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

बडतर्फी अपवादानेच..

राज्य पोलीस दलात बडतर्फीचे प्रमाण कमी आहे. बहुतांश प्रकरणांमधील शिक्षा निलंबन, प्राथमिक आणि विभागीय चौकशीपर्यंत मर्यादित राहते. पोलीस महासंचालक सुबोधकु मार जयस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या कार्यकाळात देवनार पोलीस ठाण्यात नियुक्त निरीक्षक दत्ता चौधरी यांना बडतर्फ के ले हेाते.

एका प्रकरणात संशयित आरोपींनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज के ला होता. न्यायालयाने आरोपींना अटक न करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांआधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तशाच स्वरूपाच्या सूचना के ल्या होत्या. मात्र चौधरी यांनी आरोपींशी सतत संपर्क साधून, रात्री-अपरात्री पोलीस ठाण्यात बोलावून अटकपूर्व जामीन अर्ज मिळवून देतो, तपासातही सहकार्य करतो, असे प्रलोभन दाखवत लाच मागितली. पुढे त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटकही के ले. त्यांचे वर्तन बेशिस्त, घृणास्पद, पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून त्यांना खात्यात ठेवणे जनहितार्थ ठरणार नाही, असा शेरा मारत जयस्वाल यांनी ही कारवाई के ली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 2:19 am

Web Title: mumbai police starts process of dismissing sachin waze zws 70
Next Stories
1 दुर्बल घटकांच्या वीजजोडणीसाठी डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजना
2 मुंबईत नोकरदार महिलांसाठी वसतिगृह
3 मुंबईची स्थिती सुधारतेय?
Just Now!
X