News Flash

‘खूप आठवण येतेय, लवकरच येईन’; कंगनाचं पोलिसांच्या समन्सला उत्तर

उत्तर देताना साधला शिवसेनेवर निशाणा

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याबाबत आणि अन्य काही कारणांमुळे या दोघींवर एफआआर दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यानंतर आता कंगनाने  सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेनेवर निशाणा साधत पोलिसांच्या समन्सला उपरोधिकपणे उत्तर दिलं आहे. “पेंग्विन सेना..महाराष्ट्राचे पप्पूप्रो, माझी फार आठवण येते आहे. क-क-क-क-कंगना. काही हरकत नाही, मी लवकरच येईन”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगना आणि रंगोली यांच्यावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघींना पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन समाजात तेढ पसरवणाऱ्या वक्तव्याबाबत कंगना आणि तिची बहिण रंगोली यांच्याविरोधात वांद्र्यातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर कोर्टाने त्या दोघींवर गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार वांद्रे पोलिसांत या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे.

तसेच कंगनाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. सीएएबाबत अफवा पसरवणारे आणि दंगल घडवणारे लोकच आत्ता कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती पसरवून देशात ते दहशतीचं वातावरण पसरवत असल्याचं तिनं म्हटलं होतं. याप्रकरणी कर्नाटकातील कोर्टात तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणीही कोर्टाने कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशीचे आदेश दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 8:45 am

Web Title: mumbai police summons kangana ranaut and her sister rangoli chandel and kangana reply ssj 93
Next Stories
1 भाज्या महागल्या
2 लोकलच्या वेळा गैरसोयीच्या
3 मेट्रो प्रवासासाठी तारेवरची कसरत
Just Now!
X