News Flash

मुंबई पोलिसांचे ‘ट्विटर’वर पदार्पण

सदैव तत्पर, सदैव मदतीस #AlertMumbaiSafeMumbai असे पहिले ट्विट

@mumbaipolice या हँडलच्या माध्यमातून मुंबईकरांना दिवसभरातील विवध अपडेट्स आणि सूचनांची माहिती मिळणार आहे.

समाजमाध्यमांचे वाढते महत्त्व आणि आवाका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांचेही ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलचा शुभारंभ करण्यात आला. सदैव तत्पर, सदैव मदतीस #AlertMumbaiSafeMumbai असे पहिले ट्विट करून मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलचे पदार्पण झाले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरूनही मुंबई पोलिसांच्या या नव्या ट्विटर खात्याचे स्वागत करण्यात आले. मुंबई पोलिसांचे हे ट्विटर हँडल मुंबईकरांशी सतत संपर्कात राहण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा पायंडा ठरेल.  @mumbaipolice या हँडलच्या माध्यमातून मुंबईकरांना दिवसभरातील विवध अपडेट्स आणि सूचनांची माहिती मिळणार आहे. तसेच मुंबईकरांना काही आवश्यक सल्ले देखील सुचवता येणार आहेत. आम्ही आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटीबद्ध राहू, आपल्या सूचनांचेही आम्ही स्वागत करतो, असेही ट्विट मुंबई पोलिसांच्या हँडलवरून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 1:43 pm

Web Title: mumbai police twitter handle
Next Stories
1 नेहरूंनी पटेलांचे ऐकले असते तर काश्मीरचा प्रश्न उदभवलाच नसता – काँग्रेसच्या मुखपत्रात दावा
2 पाकची भूमी शापित असल्याचे भान ठेवायला हवे, शिवसेनेचा भाजपला सल्ला
3 तंत्रवेडय़ांना ५० हजार तंत्रप्रेमींचा सलाम!
Just Now!
X