News Flash

Video: तुम्ही पळू शकता, लपू शकता पण मुंबई पोलिसांपासून वाचू शकत नाही

बॅरिकेट घेऊन पळून जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओबाबत ट्विट करून मुंबई पोलिसांनी याची सत्यता सांगितली आहे.

सोशल मिडीयावर सध्या बॅरिकेट घेऊन पळून जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओला प्रत्येक जण आपापली कहाणी चिकटवून पुढे पाठवत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडीओ सारखाच असला तरी त्यामागील कथा खूप आहेत. मात्र आता खुद्द मुंबई पोलिसांनी या व्हिडिओबाबत ट्विट करून सत्यता सांगितली आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ही चारचाकी गाडी २१ एप्रिल रोजी टोल चुकवण्याच्या प्रयत्न करत होती. त्यामुळे ही गाडी बॅरिकेट घेऊन पुढे निघाली. ही गोष्ट आम्हाला २८ एप्रिल रोजी निदर्शनास आणून दिली गेली. या घटनेचा तपास केल्यानंतर संबंधित आरोपीला शोधण्यात आले, त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्याला नवी मुमबी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, असे स्पष्टीकरण त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.

याशिवाय, मुंबई पोलिसांनी अशा लोकांसाठी इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की तुम्ही पळू शकता, लपू शकता पण मुंबई पोलिसांपासून वाचू शकत नाही. त्यांच्या या ट्विटमुळे मुंबई पोलिसांच्या सक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

हा पहा तो व्हिडिओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2018 6:46 pm

Web Title: mumbai police warns law breakers
टॅग : Car
Next Stories
1 औरंगाबादमधल्या हिंसाचारात दहावीच्या मुलाचा आणि वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
2 आता वर्सोवा-लोखंडवाला प्रवास होणार १५ मिनिटांचा
3 नांदेडमध्ये लग्नाचे वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात, ११ ठार, २५ जखमी
Just Now!
X