X
X

गणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय

मुंबईचे सौंदर्य पाहा या एकाच फ्रेममध्ये, मुंबई पोलिसांचे ट्विट

देशभरामध्ये आज मोहरमचा सण मुस्लिम धर्मीय समाज बांधव साजरा करत आहेत. तर दुसरीकडे गणेशोत्सवाही उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ट्विटवरून एक खास फोटो ट्विट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी आगळ्यावेगळ्या प्रकारे विविधतेत एकता हा संदेश अनोख्या पद्धतीने दिला आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी विक्रोळीमधील अंबिका नगर येथील एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत गणपतीचा मंडप आणि मोहरमसाठी तयार करण्यात येणारी मोहरमची साबील बाजूबाजूला दिसत आहेत. साबील म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुसाठी केलेली पाण्याची सोय. या ट्विटमध्ये मुंबई पोलिस म्हणतात, ‘मुंबईचे सौंदर्य पाहा या एकाच फ्रेममध्ये. अंबिका नगर पार्क साईट येथील हा फोटो, गणेश मंडपालाच लागून उभी असलेली ही मोहरमची छाबी दिसत आहे.’ असे लिहून #UnityInDiversity #Ganeshotsav हे दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.

एका फॉलोअर्सने पोलिसांना याला छाबी नाही तर साबील म्हणतात अशी माहिती दिली. रस्त्याने जाणाऱ्यांची तहान शमवण्यासाठी इमाम हुसैन यांच्या शहादतची आठवण म्हणून अशी पाण्याची सोय केली जाते असे सांगितले.
आपण भारतीय

अनेकांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर सकारात्मक रिप्लाय केले आहेत

यालाच मुंबई म्हणतात…

मानवता हाच धर्म

भारताचे सौंदर्य

मेरा भारत महान

वडोद्यातील फोटो

भारताचा खरा चेहरा

आपण एकत्रच

महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम सण सध्या साजरा होत आहे. इस्लामनुसार, मोहरम म्हणजे वर्षारंभ. मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर काही वाद सुरू झाले होते. मोहम्मद यांचा चुलत भाऊ आणि जावई, अली हा त्याचा उत्तराधिकारी होता. त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल शोक व्यक्त करण्याकरता शिया बांधव आजही मातम साजरा करतात. आजच्या दिवशी सामुहीक पद्धतीने शोक व्यक्त केला जातो. त्यावेळी हुसेन व इतर शियांना जखमा झाल्याच्या प्रित्यर्थ आजचे शियाही स्वतःला जखमा करून घेतात. तलवारीने स्वतःवर वार करतात. धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला मारून घेतात. हा दिवस आनंदाचा नाही तर दु:खाचा आहे. पाण्याचे वाटप करण्याला या सणामध्ये विशेष महत्व असते.

24
X