News Flash

ट्रकखाली हात चिरडला, तब्बल १६ ऑपरेशन्सनंतर परत मिळाला डावा हात

चार महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये त्याला त्याचा डावा हात गमवावा लागणार अशी स्थिती होती.

(संग्रहित छायाचित्र)

चार महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये त्याला त्याचा डावा हात गमवावा लागणार अशी स्थिती होती. पण डॉक्टरांची मेहनत आणि तब्बल १६ शस्त्रक्रियांमुळे आज प्रतीक जोशीला (२५) त्याचा हात परत मिळाला आहे. एक एप्रिलला प्रतीक त्याच्या बाईकवरुन घाटकोपर येथील घरी परतत असताना वडाळा ट्रक टर्मिन्सजवळ त्याच्या बाईकला अपघात झाला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

ट्रकने धडक दिल्यानंतर प्रतीक बाईकवरुन खाली पडला. त्याचा हात हात ट्रकच्या चाकाखाली आला. यामध्ये मोठया प्रमाणात रक्तवाहून गेले. स्थानिक नागरीक त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे हात काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे  सांगण्यात आले. कुटुंबियांनी प्रतीकला परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

सहा आठवडयात हात वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रतीकवर तब्बल १६ शस्त्रक्रिया केल्या. हाताची स्कीन आणि टिश्यूज भरण्यासाठी शरीराच्या दुसऱ्या भागातून टिश्यू घेण्यात आले अशी माहिती डॉक्टर नीलेश जी सातभाई यांनी दिली. प्रतीक जोशी वडिलांसोबत त्यांचा कौटुंबिक व्यवसाय संभाळतो. प्रतीकला क्रिकेटची आवड आहे. आता पुन्हा तो क्रिकेट खेळू शकतो. हात परत मिळाल्याबद्दल प्रतीकने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 6:30 pm

Web Title: mumbai pratik joshi left hand 16 surgeries accident dmp 82
Next Stories
1 जुलै महिन्यात मुंबईत रेकॉर्डब्रेक पाऊस
2 मुंबई – माटुंग्यात रस्त्यात बसने अचानक घेतला पेट
3 पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिला – चित्रा वाघ
Just Now!
X